शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

नव्वासह चौघांना जन्मठेप

By admin | Updated: June 27, 2015 03:10 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांनी शुक्रवारी पिंटू शिर्के हत्याकांडातील आरोपी ...

हायकोर्ट : पिंटू शिर्के हत्याकांडनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांनी शुक्रवारी पिंटू शिर्के हत्याकांडातील आरोपी मारोती ऊर्फ नव्वा संतोषराव वलके, मंगेश शिवाजीराव चव्हाण, पांडुरंग मोतीराम इंजेवार व महेश दामोदर बांते यांनाही अपेक्षेप्रमाणे जन्मठेपेचीच शिक्षा सुनावली.२२ जून रोजी उच्च न्यायालयाने प्रकरणातील अपिलांवर निर्णय देताना या चार आरोपींना भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत दोषी ठरविले होते. त्या दिवशी आरोपींचे वकील न्यायालयात उपस्थित नसल्यामुळे शिक्षा सुनावण्यासाठी आजची तारीख देण्यात आली होती. शिक्षा सुनावण्यापूर्वी आरोपींच्या वकिलांनी विविध मुद्दे मांडून दयाभाव दाखविण्याची विनंती केली. १० आठवड्यांचा वेळ नव्वासह चौघांना जन्मठेपनागपूर : न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता आरोपींना जन्मठेपेचीच शिक्षा सुनावली. तसेच, आरोपींना आत्मसमर्पण करण्यासाठी १० आठवड्यांचा वेळ दिला. १९ जून २००२ रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या सहाव्या माळ्यावर आरोपींनी पिंटू शिर्केला गुप्ती, चाकू, कुकरी व भाल्याच्या पात्याने हल्ला करून ठार मारले होते. शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील संजय डोईफोडे व संगीता जाचक यांनी बाजू मांडली.एकूण ११ आरोपींना जन्मठेपयाप्रकरणात १५ पैकी ११ आरोपींना जन्मठेप झाली आहे. १८ आॅक्टोबर २०१३ रोजी सत्र न्यायालयाने १५ पैकी ८ आरोपींना जन्मठेप सुनावली होती. यापैकी विजय किसनराव मते, राजू विठ्ठलराव भद्रे, उमेश संपतराव डहाके, रितेश हिरामण गावंडे, किरण उमराव कैथे, कमलेश सीताराम निंबर्ते व दिनेश देवीदास गायकी या सात आरोपींची जन्मठेप उच्च न्यायालयात कायम राहिली. अन्य एक आरोपी अयुब खान अमीर खानला संशयाचा लाभ मिळून निर्दोष सुटला. याशिवाय सत्र न्यायालयाने उर्वरित सात आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली होती. यापैकी नव्वा वलके, मंगेश चव्हाण, पांडुरंग इंजेवार व महेश बांते यांना उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर, अन्य आरोपी मयूर ऊर्फ बंटी शिवाजीराव चव्हाण, राजेश दयाराम कडू व संदीप नीळकंठराव सनस यांचे निर्दोषत्व कायम ठेवले.