शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

सात कर्जदारांमुळे बुडाली नवोदय बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:14 PM

रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केल्यानंतर आता नवोदय अर्बन कोआॅपरेटिव्ह बँकेचे अवसायन होणार हे स्पष्ट आहे. पण ही बँक केवळ सात बड्या कर्जदारांनी कर्ज परतफेड न केल्याने व अध्यक्षांच्या अज्ञानामुळे बंद होणार आहे.

ठळक मुद्देअध्यक्षांचे अज्ञानही भोवले

सोपान पांढरीपांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केल्यानंतर आता नवोदय अर्बन कोआॅपरेटिव्ह बँकेचे अवसायन होणार हे स्पष्ट आहे. पण ही बँक केवळ सात बड्या कर्जदारांनी कर्ज परतफेड न केल्याने व अध्यक्षांच्या अज्ञानामुळे बंद होणार आहे. लोकमतने केलेल्या तपासात नवोदय बँकेजवळ आजमितीला ५० कोटींच्या ठेवी आहेत व कर्जवाटप ५५ कोटीचे आहे. मजेची बाब म्हणजे यापैकी फक्त सात कर्जदारांकडे ३५ कोटी कर्ज थकीत आहे.हे कर्जदार पुढीलप्रमाणे १) ग्लॅडस्टोन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.- ११ कोटी, २) विजय जोशी समूह- ११ कोटी, ३) मनमोहन हिंगल- ७ कोटी, ४) हेमंत झाम बिल्डर्स- ३ कोटी, ५) अर्थवैश्य हॅबिटॅट प्रा. लि.- ९५ लाख, ६) एचक्यू बिल्डर्स- ७० लाख व ७) मनीष ढोले बिल्डर्स- ६० लाख. या कर्जदारांनी आपले अर्धे कर्ज जरी परतफेड केले असते तर नवोदय बँक तरून गेली असती. पण ते घडले नाही म्हणून बँक बुडली हे स्पष्ट आहे. यापैकी ग्लॅडस्टोन इन्फ्रास्ट्रक्चरची बेसा येथे फ्लॅट स्कीम आहे व ती बँकेकडे गहाण आहे. तिचे बाजारमूल्य २८ कोटी आहे. पण बँकेने दोनवेळा प्रयत्न करूनही मालमत्ता विकल्या जाऊ शकली नाही.ग्लॅडस्टोन इन्फ्रास्ट्रक्चरचे भागीदार सचिन मित्तल व बाळकृष्ण गांधी हे आहेत. विजय जोशी समूहाच्या दोन ते तीन कंपन्यांकडे नवोदय बँकेचे ११ कोटी थकीत आहेत. परंतु हे कर्ज कोणत्या व्यवसायासाठी दिले ते अध्यक्ष अशोक धवड यांनाच माहीत नाही. ‘प्रॉपर्टी डेव्हलपमेंटसाठी कर्ज दिले’ एवढेच धवड सांगतात. विजय जोशी यांनी दिलेला धनादेश वटला नाही म्हणून त्यांच्यावर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटस अ‍ॅक्टच्या कलम १३८ अन्वये कोर्टात केस सुरू आहे. त्यांनी बँकेत काय तारण दिले हे कळू शकले नाही.मनमोहन हिंगल समूहाकडे बँकेचे सात कोटी थकीत आहे. तारण म्हणून हिंगल समूहाने वर्धा रोडवरील ली मेरिडियन हॉटेलजवळचा एक ५०,००० चौ.फुटाचा भूखंड गहाण ठेवल्याचे कळते. या भूखंडाची नक्की किंमत कळू शकली नाही.हेमंत झाम बिल्डर्सकडे तीन कोटी थकीत आहे. या कर्जदाराने वानाडोंगरीजवळ एक भूखंड गहाण ठेवला आहे. किंमत माहीत नाही.अर्थवैश्य हॅबिटॅट ही दुदानी यांची कंपनी आहे. कंपनीने इतवारीतील एक मालमत्ता नजरगहाण म्हणून दिली आहे. नक्की किंमत माहीत नाही. याचबरोबर एचक्यू बिल्डर्स व मनीष ढोले बिल्डर्स यांच्याही बाबत फारशी माहिती मिळू शकली नाही.लोकमतशी बोलताना नवोदय बँकेचे अध्यक्ष अशोक धवड यांनी आपण सभासदांनी निवडून दिलेले अध्यक्ष आहोत. त्यामुळे जनरल मॅनेजर/सीईओ यांच्या सूचनेनुसार काम करत होतो असा बचावात्मक पवित्रा घेतला. पण हे कारण पटणारे नाही. बँकेच्या पतनासाठी धवड यांचे बँक व्यवसायाबद्दलचे अज्ञान व अनास्था तेवढीच कारणीभूत आहे हे स्पष्ट आहे. त्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्याच्या कलम ७९ अंतर्गत धवड यांची आर्थिक जबाबदारी निश्चित होणार व ती रक्कम भविष्यात त्यांच्याकडून वसूल होणार हे नक्की आहे.

टॅग्स :bankबँक