शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

निव्ह मार्शल महाराष्ट्र क्वीन

By admin | Updated: August 26, 2014 01:00 IST

रिद्धी-सिद्धी कल्चरल प्रमोशनल आॅर्गनायझेशनच्यावतीने आयोजित ‘फॅशन शो’मध्ये मुंबई येथील निव्ह मार्शल हिने ‘गुरुदेव यामाहा महाराष्ट्र क्वीन-२०१४ ’चा किताब पटकाविला. तसेच नीलम वीरवानी

फॅशन शो : नीलम उपविजेता तर विनीताला तृतीय पुरस्कार नागपूर : रिद्धी-सिद्धी कल्चरल प्रमोशनल आॅर्गनायझेशनच्यावतीने आयोजित ‘फॅशन शो’मध्ये मुंबई येथील निव्ह मार्शल हिने ‘गुरुदेव यामाहा महाराष्ट्र क्वीन-२०१४ ’चा किताब पटकाविला. तसेच नीलम वीरवानी ही उपविजेता ठरली असून, विनीता टेकचंदानी हिने तृतीय पुरस्कार मिळविला. सोमवारी वसंतराव देशपांडे सभागृहात ही स्पर्धा पार पडली. यावेळी अतिथी म्हणून जनार्दन मिश्रा, काँग्रेसचे माजी शहर प्रमुख जयप्रकाश गुप्ता, आलोक बन्सल, अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया व सतीश गोयल उपस्थित होते. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत नागपूरसह मुंबई, पुणे व गोवा येथील एकूण १५ स्पर्धकांनी भाग घेतला होता. या संपूर्ण स्पर्धेत तीन फेऱ्या झाल्या. यापैकी पहिल्या फेरीत १५ पैकी १० उत्तम स्पर्धकांची निवड करण्यात आली. तसेच दुसऱ्या फेरीत १० पैकी ६ निवड करून, अंतिम तिसऱ्या फेरीत विजेत्याची घोषणा करण्यात आली. या संपूर्ण स्पर्धेत अखिलेश चतुर्वेदी, स्वर्णिमा खरे, सर्वेश अग्रवाल, रुचिता अग्रवाल व लोपमुद्रा राऊत यांनी परीक्षकांची भूमिका पार पाडली. कार्यक्रमाच्या शेवटी स्पर्धेचे आयोजक दिनेश मिश्रा, दीपाली मिश्रा व शाकीत शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. दरम्यान, ‘गुरूदेव यामाहा महाराष्ट्र क्वीन-२०१४ ’चा किताब पटकाविणाऱ्या निव्ह मार्शल हिला यामाहा कंपनीची स्कूटर भेट देण्यात आली. संचालन पूनम कुकरेजा यांनी केले. (वाणिज्य प्रतिनिधी)राहुलच्या गाण्यांनी भरला जोश या सौंदर्य स्पर्धेत तरुण गायक राहुल मुखर्जी याच्या गीतांनी जोश भरण्याचे काम केले. त्याने ‘विठ्ठला विठ्ठला, श्री गणेश देवा..., मैं तेनू समजा वा जी... व हम तेरे बिन अब रह नहीं सकते...’ अशी एकापेक्षा एक सरस गाणी सादर करून सभागृहाच्या जोरदार टाळ्या मिळविल्या.