शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

नॅशनल पेपर डे; देशात वर्षाला २५ लाख टन कागदाचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 10:51 IST

आज देशभरात ६०० पेपर मिल्स कार्यरत असून जगात सर्वात मोठी पेपर इंडस्ट्री म्हणून भारताची ओळख आहे.

ठळक मुद्दे देशात एका वर्षात २५.३७ लाख टन कागदाचा वापर, दरवर्षी १० टक्के वाढदेशात ६०० पेपर मिल्स३५ टक्के टाकाऊ पेपर (रद्दी) व ४२ टक्के कृषी वेस्ट (गहू व धानाचे कुटार) अशी ७७ टक्के पेपर निर्मिती टाकाऊ पदार्थापासून. बांबू व युकेलिप्टसच्या वूडपल्पपासून २३ टक्के पेपर निर्मिती.लेखन, प्रिन्टींग व झेरॉक्स पेपरचा मोठा निर्यातदार देश.

निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात २०१९-२० या वर्षाला २५.३७ लाख टन कागदाचा वापर झाल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे यात दरवर्षी १० टक्क्याची वाढ होत असल्याची नोंद असोसिएशन ऑफ चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्री ऑफ इंडियाने केली आहे. कोरोना संकटाच्या काळात यामध्ये कमतरता आली असली तरी देशातील सर्वात वाढणारे क्षेत्र असून यातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे १५ लाख लोकांना रोजगार मिळत आहे.माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी १ ऑगस्ट १९४० रोजी देशातील पहिली पेपर मिल पुणे येथे सुरू केली. पेपर मिल्स असोसिएशन सदस्यांच्या मागणीनंतर केंद्र शासनाने हा दिवस नॅशनल पेपर डे म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली आहे. यानिमित्त दि नागपूर पेपर ट्रेडर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष व पेपर डे कमिटीचे चेअरमन असीम बोरडिया यांनी पेपर उद्योगाच्या सद्यस्थितीची माहिती दिली. आज देशभरात ६०० पेपर मिल्स कार्यरत असून जगात सर्वात मोठी पेपर इंडस्ट्री म्हणून भारताची ओळख आहे.

विशेष म्हणजे भारत हा लेखन, प्रिन्टींग तसेच झेरॉक्स पेपरचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. शिवाय पॅकेज व कोटेड पेपरची निर्मितीही मोठ्या प्रमाणात होत आहे. दरम्यान युएसए, युरोप, दुबई, सिंगापूर आदी देशांमधून टिशू पेपर, टि-बॅग टिशू, फिल्टर पेपर, मेडिकल ग्रेड कोटेड पेपर आदींची आयात केली जाते.मात्र असे असले तरी पेपर उद्योग पर्यावरणासाठी हानीकारक असल्याची बदनामी होत असल्याची खंत असीम बोरडिया यांनी व्यक्त केली. हा प्रकार या उद्योगाविषयी संभ्रम पसरविणारा आहे. वास्तविक ७७ टक्के पेपर उत्पादन टाकाऊ वस्तूंपासून होते. ४२ टक्के कृषी वेस्ट (धान व गव्हाचे कुटार) आणि ३५ टक्के टाकाऊ पेपर (रद्दी) रिसायकल करून. यातून रोजगार निर्मितीच होत आहे. उर्वरित २३ टक्के युकेलिप्टस व बांबूच्या वूड पल्पपासून. त्यातही वनसंवर्धनाच्या नवीन धोरणानुसार पेपर मिल्स मालकांना वृक्ष कापल्यानंतर पाचपट वृक्षलागवड करणे बंधनकारक करण्यात आले असल्याने तोही धोका कमी झाला आहे. उलट यामुळे कृषी रोजगाराला चालना मिळत आहे. त्यामुळे पेपर उद्योगाबाबत संभ्रम पसरविण्यात येऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

१५ लाख टन वूडपल्पची गरजसध्या पेपर उद्योगात वर्षाला ११ लाख टन वूडपल्पची गरज आहे आणि ९ लाख टन वूडपल्प उपलब्ध आहे. उरलेली गरज पूर्ण करण्यासाठी विदेशातून वूडपल्प आयात करावा लागतो आहे. २०२४-२५ मध्ये ही गरज १५ लाख टनापर्यंत वाढणार आहे. मात्र गेल्या ८-१० वर्षापासून विविध राज्यांनी कायद्यात बदल करीत बांबूच्या व्यावसायिक वृक्षारोपणाला मान्यता दिली आहे. शिवाय या काळात पेपर मिल्स मालकांनीही नियमानुसार वृक्षलागवड केली असून येत्या काळात ही तफावत भरेल आणि गरजेपेक्षा जास्त वूडपल्पचे उत्पादन होईल, असा विश्वास बोरडिया यांनी व्यक्त केला.

 

 

टॅग्स :businessव्यवसाय