शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षकाच्या छळामुळे राष्ट्रीय धावपटू त्रस्त

By admin | Updated: May 25, 2014 00:58 IST

नागपूर : आदिवासी असलेला नागराज भानुदास खुरसने मनमाडचा. २00८ साली नागपूरच्या क्रीडा प्रबोधिनीत आला. पुढच्या पाच वर्षांंंत त्याने अँथ्लेटिक्समध्ये राज्याचा नावलौकिक वाढवला.

नागपूर : आदिवासी असलेला नागराज भानुदास खुरसने मनमाडचा. २00८ साली नागपूरच्या क्रीडा प्रबोधिनीत आला. पुढच्या पाच वर्षांंंत त्याने अँथ्लेटिक्समध्ये राज्याचा नावलौकिक वाढवला. विविध शालेय राष्ट्रीय स्पर्धा तसेच फेडरेशनद्वारा आयोजित स्पर्धेत ११ पदके जिंकली. या प्रवासात ज्या कोचची मदत झाली त्याच कोचने आपला छळ सुरू केल्याचा नागराजचा आरोप आहे.

जाचापायी क्रीडा प्रबोधिनी सोडावी लागली. तरीही फोनवर धमक्या येत आहेत. यामुळे मैदानावर सरावासाठी जायचीही भीती वाटते. करियर संपविण्याची धमकी दिली जात आहे. मैदानावर सराव करायचा तर पुढे स्पर्धेत उतरायला मिळणार की नाही, याची चिंता आहेच. ऐन उमेदीच्या काळात नागराजसारखा युवा धावपटू मैदानाकडे पाठ फिरविण्याच्या विचारात आहे. लोकमतने त्याची व्यथा जाणून घेतली. त्याला धीर दिला. बोलते केले, तेव्हा तो म्हणाला,‘३000 व १५00 मीटर दौड हे माझे आवडते प्रकार. नुकतीच मी १२ वी ची परीक्षा दिली. जयकुमार टेंभरे हे माझे शासकीय कोच. तीन महिन्यांआधीपर्यंंंत सर्व सुरळीत होते. पण क्रीडा प्रबोधिनीत टेंभरे यांनी प्रशासकीय हस्तक्षेप सुरू केला आणि आम्हा खेळाडूंच्या सरावात अडथळा सुरू झाला. तसे पाहता दीड वर्षांंंपासून टेंभरे सर कंडिशनिंगच्या नावाखाली फर्मान सोडायचे. स्वत: प्रशिक्षण सोडून प्रशासकीय कामात अडकून जायचे. कुणी आवाज केला की तुला हाकलून लावेन अशी धमकी ठरलेली असायची.’

 

क्रीडा प्रबोधिनीत सध्या १२ मुले आणि १८ मुली आहेत. गंमत म्हणजे १९९६ ला क्रीडा प्रबोधिनी सुरू झाल्यापासून जेवण देणारा कॉन्ट्रॅक्टर अधिकार्‍यांशी न पटल्यामुळे काही दिवसांपूर्वी मेस सोडून गेला. खेळाडूंना जेवण देण्याची जबाबदारी क्रीडा खात्यातील अधिकार्‍यांनीच स्वीकारली. देखरेख टेंभरे यांचीच आहे. नागराजने जेवण चांगले मिळावे असा आवाज उठवताच कोचच्या पायाखालची वाळू सरकली. नागराजसारखी अन्य मुले अन्यायाविरुद्ध बोलू नये यासाठी नागराजवरच अतिशय गंभीर आरोप ठेवण्यात आला. याविषयी विचारले असता नागराज म्हणतो,‘माझे मेसमधील महिलेशी संबंध जोडण्यात आले. मी ते नाकारले तेव्हा करियर संपविण्याची धमकी मिळाली. मला सबब देण्यात आली. शाळा बंद असल्याने गावाला जा. मी सांगेन तेव्हा स्पर्धेसाठी ये असे टेंभरे सरांनी सांगितले.’

कोच टेंभरे यांनी तुला तयार केले मग आताच कामगिरी का माघारली, या प्रश्नाच्या उत्तरात नागराज म्हणाला,

‘२0१0 साली बेंगळुरु येथे तीन किमी दौडीत मी ८ मिनिटे ५0 सेकंदांचा रेकॉर्ड नोंदविला आहे. भावी आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणून टेंभरे सर माझ्याकडे पहायचे. पण दीड वर्षांंंपासून मार्गदर्शन नाही. याचा परिणाम कामगिरीवर झाला. नुकत्याच चेन्नईत झालेल्या स्पर्धेत मी आठव्या स्थानावर घसरलो. शासनाच्या नियमानुसार क्रीडा प्रबोधिनीत खेळाडूंना कुठला आहार द्यावा, याचा चार्ट आहे पण याकडे साफ दुर्लक्ष केले जाते. जे बोर्डवर लिहिले आहे त्यापैकी खायला काही मिळत नाही. जे खेळाडू ओरड करतात त्यांना दम देऊन मुस्कटदाबी केली जाते. मी या जाचाला कंटाळलो. अखेर वरिष्ठांना अन्यायाचा पाढा वाचणारे पत्र लिहिले व क्रीडा प्रबोधिनीतून बाहेर पडलो. माझ्या पत्राद्वारे इतर खेळाडूंना लाभ व्हावा हा हेतू आहे.’

क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य असलेले प्रभारी उपसंचालक विजय संतान यांच्या कानावर हा प्रकार टाकला तेव्हा त्यांनी नागराजला प्रबोधिनी सोडण्याची वेळ येणार नाही, असे आश्‍वस्त केले. आदिवासी समाजातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविणे हे शासनाचे धोरण असल्याने नागराजच्या करियरशी कुणी खेळू शकणार नाही, यासाठी लक्ष घालण्याचे त्यांनी कबूल केले. दुसरीकडे कोच टेंभरे यांना मात्र अचानक प्रबोधिनी सोडणारा नागराज कुठे गेला याबद्दल काहीही माहिती नाही.(क्रीडा प्रतिनिधी)