शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

‘नथुराम’भक्त पोंक्षे शिवसेनेचे ‘स्टार प्रचारक’

By admin | Updated: January 25, 2017 02:32 IST

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेना, मनसे व रासपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

उद्धव, आदित्य ठाकरेंसह ४० जणांचा यादीत समावेश नागपूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेना, मनसे व रासपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह ४० जणांचा यादीत समावेश आहे. विशेष म्हणजे ‘हे राम नथुराम’ या नाटकामुळे वादात सापडलेल्या शरद पोंक्षे यांनादेखील पक्षाने ‘स्टार प्रचारक’ केले आहे. नागपुरात पोंक्षे यांचा जोरदार विरोध झाला. त्या पार्श्वभूमीवर प्रचारादरम्यानदेखील त्यांना विरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यात फेब्रुवारी महिन्यात १० महानगरपालिका, २५ जिल्हा परिषदा व २८३ पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. सर्वच पक्षांकडून प्रचाराचा धुरळा उडणार आहे. प्रत्येकच पक्षाने स्टार प्रचारकांची यादी तयार केली असून ती निवडणूक आयोगाकडे पाठविली आहे. शिवसेनेच्या स्टार प्रचारकांच्या यादीत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, विद्यमान उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, वनमंत्री रामदास कदम यांच्यासह विविध आमदार व खासदारांचा समावेश आहे. आदेश बांदेकर, अमोल कोल्हे या मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंतांनादेखील ‘स्टार प्रचारक’ करण्यात आले आहे.दुसरीकडे मनसेतर्फेदेखील ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे. यात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर यांचा प्रामुख्याने समावेश आहे. पशुसंवर्धन राज्यमंत्री महादेव जानकर हे रासपचे ‘स्टार प्रचारक’ राहणार आहेत. ‘रासप’तर्फे १४ जणांची यादी देण्यात आली आहे.(प्रतिनिधी)