शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नासुप्रच्या विश्वस्तपदी शिंगणे?

By admin | Updated: September 22, 2015 04:07 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू व जीवलग मित्रांपैकी एक असलेले नगरसेवक भूषण शिंगणे यांची नासुप्रच्या

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू व जीवलग मित्रांपैकी एक असलेले नगरसेवक भूषण शिंगणे यांची नासुप्रच्या विश्वस्तपदी वर्णी लागेल, हे जवळपास निश्चित झाले आहे. पक्षातर्फे अधिकृतपणे शिंगणे यांचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. २२ सप्टेंबर रोजी पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत नावावर शिक्कामोर्तब होईल व २३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सभेत शिंगणे यांच्या नावाची महापौर प्रवीण दटके घोषणा करतील. डॉ. छोटू भोयर यांनी काही दिवसांपूर्वी नासुप्र विश्वस्तपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासूनच या पदासाठी इच्छुकांनी लॉबिंग सुरू केले होते. शिंगणे यांच्यासह नगरसेवक बंडू राऊत, सुनील अग्रवाल, गिरीश देशमुख, नीता ठाकरे, चेतना टांक यांचेही नाव स्पर्धेत होते. प्रत्येकाचा दावा तगडा मानला जात होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नागपुरात होते. यावेळी दोन्ही नेत्यांची आपसात चर्चा होऊन शिंगणे यांचे नाव निश्चित करण्यात आले. स्थायी समिती अध्यक्षही निश्चित भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नासुप्र विश्वस्तपदी शिंगणे यांचे नाव निश्चित करताना स्थायी समितीच्या पुढील अध्यक्षाचे नावही निश्चित करण्यात आले आहे. मात्र, सध्याच संबंधित नावाचा खुलासा करायचा नाही, असेही पक्षांतर्गत ठरले आहे. आज होणार निर्णय विश्वस्तपदासाठी अद्याप कुणाचेही नाव निश्चित करण्यात आलेले नाही. भाजपच्या शहर संसदीय मंडळाची मंगळवारी रात्री बैठक आयोजित करण्यात आली आहे. तीत दोन्ही ज्येष्ठ नेत्यांचे मत विचारात घेऊन चर्चा केली जाईल व निर्णय घेतला जाईल.आ. कृष्णा खोपडे, शहर अध्यक्ष, भाजप