शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

नासुप्रचा मेट्रोरिजन विकास आराखडा फसवा

By admin | Updated: October 2, 2015 07:40 IST

नागपूर सुधार प्रन्यासने तयार केलेल्या मेट्रोरिजन विकास आराखड्यावर येत्या ३ आॅक्टोबरला नासुप्रच्या अंबाझरी

नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासने तयार केलेल्या मेट्रोरिजन विकास आराखड्यावर येत्या ३ आॅक्टोबरला नासुप्रच्या अंबाझरी रोडवरील कार्यालयात सकाळी ११ वाजतापासून जनसुनावणी आयोजित केली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी या जनसुनावणीत सहभागी होऊन मेट्रोरिजन आराखड्याला विरोध करण्याचे आवाहन जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार यांनी केले आहे.नासुप्रच्या मेट्रोरिजनमध्ये जिल्ह्यातील ७२० गावांचा समावेश आहे. याअंतर्गत नासुप्रने मेट्रारिजनचा विकास आराखडा तयार केला आहे. मात्र या आराखड्यात विकास प्रकल्पाबाबत भेदभाव करण्यात आल्याचा आरोप पवार यांनी केला. वर्धा रोडसारख्या काही ठराविक क्षेत्रात विकासाचे प्रकल्प राबवून इतर क्षेत्रावर अन्याय केला गेल्याचे ते म्हणाले. हा आराखडा लागू झाल्यास ७२० गावातील २ लाख घरे आणि १० लाख भूखंड अनियमित होणार असून, हे भूखंड नियमित करण्याबाबत कोणतीही भूमिका नासुप्रने घेतली नाही, त्यामुळे कोणत्याही क्षणी बुलडोझर चालविण्यास नासुप्र मोकळी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या जमिनी ग्रीन झोनमध्ये टाकल्याने आरक्षित झालेली जागा शेतकऱ्यांना विकता येणार नाही व या जागेचा मोबदला मिळणार नाही. मेट्रोरिजनमध्ये आलेल्या बहुतेक गावातील नागरिकांना विकास आराखड्याबाबत माहितीच नसल्याचे प्रशांत पवार यांनी सांगितले. विकास आराखड्याच्या नावाखाली नासुप्र लोकांच्या डोळ्यात धूळ झोकत असल्याचा आरोप त्यांनी लावला. नासुप्रच्या जनसुनावणीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन मेट्रोरिजन विकास आराखड्याला विरोध करण्याचे आवाहन पवार यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केला. पत्रपरिषदेला विजयकुमार शिंदे, अरुण वनकर, सुभाष बांते, रविशंकर मांडवकर, किशोर चोपडे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)