शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील हज हाऊसच्या चोहीकडील रस्ते अरुंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 12:59 IST

महापालिका प्रशासनाने हज यात्रेदरम्यान पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्याचा दावा केला आहे. परंतु आतापर्यंत महापालिकेच्या प्रवर्तन विभागाने हज हाऊसचे अतिक्रमण हटविलेले नाही.

ठळक मुद्देयात्रेदरम्यान पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्याचा दावा फोलमनपाने हटविले नाही अतिक्रमण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका प्रशासनाने हज यात्रेदरम्यान पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्याचा दावा केला आहे. परंतु आतापर्यंत महापालिकेच्या प्रवर्तन विभागाने हज हाऊसचे अतिक्रमण हटविलेले नाही. दोन दिवसात नागपूरसह विदर्भ, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातून हज यात्रेकरू पोहोचणार आहेत. अतिक्रमणामुळे वाहतुकीच्या समस्येचा त्रास होऊ शकतो. सुविधांच्या बाबतीत मोठे दावे करून महापालिका उदासीन धोरण दाखवीत आहे. ‘लोकमत’ने हज हाऊसच्या परिसरातील मार्गाची पाहणी केली असता धक्कादायक चित्र दृष्टीस पडले. अतिक्रमणामुळे केवळ हज हाऊसच्या बाजूचे रस्तेच अरुंद झाले नाहीत, तर हज हाऊसच्या सुंदरतेवरही परिणाम झाला आहे.नागपूर इंबार्केशनवरून १८ जुलैला हज यात्रा सुरू होत आहे. या वेळी नागपूर इंबार्केशनवरून तीन हजार हज यात्री प्रवासासाठी रवाना होणार आहेत. यात नागपूर, विदर्भ, छत्तीसगड, मध्यप्रदेशच्या हज यात्रेकरूंचा समावेश आहे. यादरम्यान मुस्लीम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने हज हाऊसमध्ये येतात. सकाळपासून रात्रीपर्यंत नागरिकांची वर्दळ राहते. हे लक्षात घेऊन ९ जुलैला विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी एक बैठक आयोजित केली होती. बैठकीत सर्व व्यवस्था चांगल्या पद्धतीने करण्याच्या सूचना त्यांनी संंबंधित विभागांना दिल्या होत्या. विभागीय आयुक्तांनी हज हाऊसजवळील अतिक्रमण हटविण्यासाठी निर्देश दिले होते. याशिवाय महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजीज शेख यांनी हज हाऊसमध्ये समीक्षा बैठक घेऊन चांगली व्यवस्था करण्याचा दावा केला होता, तरीसुद्धा महापालिकेने अतिक्रमण हटविले नाही.

नियमित कारवाईची गरजहज हाऊसच्या चारही बाजूंनी अतिक्रमण झाले आहे. महापालिका प्रशासनाला येथे नियमित कारवाई करण्याची गरज आहे. परंतु हज यात्रेदरम्यानही कारवाई न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. हज हाऊसच्या प्रवेशद्वाराकडून सीए रोडकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर अतिक्रमण झाले आहे. याच मार्गाने यात्रेकरूंची वाहने आत येतात. अशास्थितीत येथे वाहतूक विस्कळीत होते. हज हाऊसकडून बजेरियाकडे जाणारा रस्ता अरुंद झाला आहे. हज हाऊसच्या भिंतीला लागून गॅरेज, भंगार व्यावसायिकांची दुकाने आहेत. गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेली वाहने रस्त्यावर उभी राहतात. हज हाऊसच्या एका टोकावर जुना जेलखाना रोडही अतिक्रमणामुळे अरुंद झाला आहे. येथे स्थानिक दुकानदार, खासगी कार्यालयाची वाहने, हातठेले आदींचे अतिक्रमण आहे. हज हाऊसच्या मागील भागात यात्रेकरूंची वाहने उभी राहतात, परंतु तेथेही अतिक्रमण आहे.

हज हाऊसच्या सुंदरतेला ग्रहणहज हाऊसची सुंदर इमारत पाहताच आकर्षित करते. परंतु चारही बाजूंनी पसरलेल्या अतिक्रमणामुळे हज हाऊसच्या सुंदरतेला ग्रहण लागले आहे. अतिक्रमणामुळे हज हाऊसची सुंदरता कमी होण्यामागे प्रशासनाचा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे. अतिक्रमणामुळे हज हाऊसची भिंतही खराब झाली आहे. अनेक ठिकाणी भिंतीला लागून पक्के शेड तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे भिंतीवरील नक्षीकाम खराब झाले आहे.

‘हज हाऊस जवळील अतिक्रमणामुळे यात्रेदरम्यान त्रास होऊ शकतो. त्यामुळे विभागीय आयुक्तांच्या बैठकीत जिल्हा हज समितीने अतिक्रमण हटविण्याची मागणी केली होती. विभागीय आयुक्तांनी बैठकीतच महापालिका प्रशासनाच्या संबंधित विभागास अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते. यात्रा सुरू होण्यापूर्वी अतिक्रमण हटविणे आवश्यक आहे.’- जुनेद खान, अध्यक्षनागपूर जिल्हा हज समिती

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका