शाळेचा गेल्या काही वर्षांतील निकाल, गुणवत्ता, उपलब्ध सोयी या आधारावर निवड करण्यात आली. लॅबमध्ये वर्ग १ ते १० वीपर्यंतच्या विद्यार्ध्यांकडून थ्री डी प्रिंटर, ड्रोन मेकॅनिक्स, रोबोटिक्स, डिजिटल टूल्स, बायो मेडिकल, सॉईल अॅनालिसीस बाबत माहिती व त्यावर आधारित प्रकल्प साकारण्यात येणार असल्याची माहिती या प्रकल्पाचे प्रमुख राजेश मडावी यांनी प्रस्ताविकातून दिली. मुख्याध्यापिका वर्षा जैन यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ शिक्षक प्रदीप गणोरकर, राजेश मडावी, प्रकाश अढाऊ, अशोक वैराळे, नावेद अन्सारी, मोहम्मद इरफान, अरुण थाटकर, निशांत साकलवार रोबीटीकस सेन्टरचे प्रवीण बैलमारे, आदित्य कुथे, योगेश निंबुलकर व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी लॅब निर्माण करण्यास परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन वैशाली काळे तर आभार नावेद अन्सारी यांनी मानले.
--
विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या प्रकल्पांची पाहणी करताना नगराध्यक्ष अभिजित गुप्ता व इतर मान्यवर.