शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

नारायण राणे शंभर टक्के मंत्री बनतील !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 21:11 IST

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत विविध कयास लावण्यात येत आहेत. मात्र हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असून नारायण राणे हे १०० टक्के मंत्री बनतील, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

ठळक मुद्देभाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा दावाहिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार‘लोकमत’ला सदिच्छा भेट

ऑनलाईन लोकमत नागपूर : काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत विविध कयास लावण्यात येत आहेत. मात्र हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असून नारायण राणे हे १०० टक्के मंत्री बनतील, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. दानवे यांनी गुरुवारी ‘लोकमत’ भवनाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी संपादकीय विभागासोबत विविध विषयांवर संवाद साधला.मंत्रिमंडळाचा विस्तार जाणूनबुजून लांबविण्यात आलेला नाही. नारायण राणे यांच्यामुळे तर विस्तार अजिबातच लांबलेला नाही. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर कधीही विस्तार होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. नारायण राणे यांना मंत्रिपद दिल्यानंतर शिवसेनेशी संबंध ताणले जाण्याच्या शक्यतेचे त्यांनी खंडन केले. सरकारमध्ये सद्यस्थितीत या दोन्ही पक्षात कुठलेही ताणतणाव नसल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या २५ वर्षांपासून दोन्ही पक्ष सोबत आहेत. त्यांचे नेते काही बोलतात, तर आम्हीदेखील त्याला उत्तर देतो. मात्र मनभेद नाहीत. शिवसेनेपासून आम्हाला काहीही धोका नाही, असे प्रतिपादन दानवे यांनी केले. रावसाहेब दानवे यांच्यासमवेत भाजपचे शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे, विदर्भ संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, ‘एमएसईबी’चे संचालक विश्वास पाठक हेदेखील उपस्थित होते. ‘लोकमत’चे संचालक (परिचालन) अशोक जैन यांनी दानवे यांचे स्वागत केले.वेगळ्या मराठवाड्याला पाठिंबा नाहीवेगळ्या विदर्भासह स्वतंत्र मराठवाडा राज्याची मागणीदेखील समोर येत आहे. यासंदर्भात दानवे यांना विचारणा केली असता वेगळ्या मराठवाड्याच्या मागणीला भाजपाचा पाठिंबा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मराठवाडा हे वेगळे राज्य करणे संयुक्तिक राहणार नाही. तेथे आवश्यक संसाधनांचा विकास होत नाही, तोपर्यंत अशा मागणीला काही अर्थ नाही, असे ते म्हणाले.संघटन मंत्रिपदासाठी माणसांचा शोधरवींद्र भुसारी यांच्या राजीनाम्यानंतर भाजपचे राज्य संघटनमंत्री हे पद रिक्तच आहे. संघटन मंत्रिपदासाठी पक्षाने ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’चेच धोरण घेतले आहे. या पदासाठी योग्य माणसांचा आमचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपामध्ये संघटन मंत्रिपद हे महत्त्वाचे मानण्यात येते हे विशेष.‘इनकमिंग’मुळे भाजपाची वाढएक काळ होता जेव्हा भाजपाचे राज्यात चौथे स्थान होते. दुसºया स्थानावर येण्यासाठी पक्षाला प्रचंड संघर्ष करावा लागला होता. मात्र केंद्र व राज्यात सत्ताबदल झाल्यापासून इतर पक्षातील चांगली माणसे आमच्याकडे येत आहेत. आम्ही त्यांचे स्वागतच करीत आहोत. या ‘इनकमिंग’मुळे भाजपाच्या ताकदीमध्ये वाढ झाली आहे व पक्ष राज्यात अव्वल झाला आहे, असे रावसाहेब दानवे म्हणाले. पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना अनेकदा इच्छा असूनही तिकीट देणे शक्य नसते. राजकीय कारणांमुळे नवीन लोकांना उमेदवारी द्यावी लागते, असेदेखील ते म्हणाले. प्रसाद लाड यांच्या विधान परिषद उमेदवारीवरून पक्षात कुठलाही असंतोष नाही, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Politicsराजकारण