शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

नंदा जिचकार नव्या महापौर

By admin | Updated: March 6, 2017 01:48 IST

महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या नंदा शरद जिचकार तर उपमहापौरपदी दीपराज भय्याजी पार्डीकर दणदणीत मतांनी विजयी झाले.

८२ मतांनी विजय : उपराजधानीत महिलाराज उपमहापौरपदी दीपराज पार्डीकर यांची निवडनागपूर : महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या नंदा शरद जिचकार तर उपमहापौरपदी दीपराज भय्याजी पार्डीकर दणदणीत मतांनी विजयी झाले. दोघांनाही पक्षाची सर्व १०८ मते पडली. जिचकार यांचा ८२ मतांनी तर पार्डीकर यांचा ८० मतांनी विजय झाला. यासोबतच जिचकार यांना उपराजधानीच्या प्रथम नागरिक होण्याचा मान मिळाला आहे.महापौरपदाच्या काँग्रेसच्या उमेदवार स्नेहा निकोसे यांना २६ मते तर बसपाच्या वंदना चांदेकर यांना १० मते मिळाली. उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे नितीश ग्वालबंशी यांना २८ मते तर बसपाचे नरेंद्र वालदे यांना १० मते मिळाली. काँग्रेसचे दोन नगरसेवक उशिरा पोहोचल्याने त्यांना महापौरपदाच्या निवडणुकीत मतदान करता आले नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि एक अपक्ष असे तीन नगरसेवक या निवडणुकीत तटस्थ राहिले. एक नगरसेविका अनुपस्थित होती तर एकीने राजीनामा दिला आहे. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीत १५१ पैकी १४७ सदस्यांनी सहभाग घेतला. महापालिकेच्या टाऊन हॉल येथे रविवारी सकाळी महापौर आणि उपमहापौर यांची निवड करण्यासाठी पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. महापौर पदासाठी भाजपच्या नंदा शरद जिचकार, काँग्रेसच्या स्नेहा निकोसे तर बसपाच्या वंदना चांदेकर यांनी उमेदवारी दाखल केली होती. उपमहापौर पदासाठी ााजपाचे दीपराज पार्डीकर, काँगेसचे नितीन ग्वालबंशी तर बसपातर्फे नरेंद्र वालदे आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. निवडणुकीतून कुणीही माघार न घेतल्याने सचिन कुर्वे यांनी निवडणुकीची प्रक्रिया घेतली. महापालिकेतील १५१ सदस्यांपैकी १०८ सदस्य भाजपाचे निवडून आल्याने सभागृहात स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे अपेक्षेनुसार जिचकार व पार्डीकर यांचा दणदणीत मतांनी विजय झाला. ही निवडणूक एक औपचारिकताच ठरली. (प्रतिनिधी)सत्तापक्ष व विरोधी पक्षनेत्यांची घोषणामहापौर नंदा जिचकार यांनी विशेष सभेत सभागृहातील विरोधी पक्षनेतेपदी संजय महाकाळकर यांची तर सत्तापक्षनेते म्हणून संदीप जोशी यांच्या निवड करण्यात आल्याची घोषणा केली. महापालिकेतील संख्याबळाचा विचार करता महाकाळकर यांना चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे. मतदानात १४७ सदस्यांचाच सहभागमतदान प्रक्रि येत राष्ट्रवादी काँग्रेसचे दुनेश्वर पेठे, शिवसेनेचे किशोर कुमेरिया व अपक्ष नगरसेविका आभा पांडे यांनी तटस्थतेची भूमिका घेतली. शिवसेनेच्या नगरसेविका मंगला गवरे अनुपस्थित होत्या तर काँग्रेसच्या गार्गी चोपरा यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे हरीश ग्वालबंशी व जुल्फेकार अहमद भुट्टो सभागृहात उशिरा पोहोचल्याने या दोघांना महापौरपदाच्या निवडणुकीत मतदान करता आले नाही. त्यामुळे काँग्रेसच्या स्नेहा निकोसे यांना २६ तर नितीश ग्वालबंशी यांना २८ मते मिळाली.स्थायी समितीत महिलाराज महापौरपदी निवड झाल्यावर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत सभागृहातील संख्याबळाच्या आधारावर स्थायी समितीच्या सदस्यांची पक्षनिहाय संख्या निश्चित करण्यात आली. त्यानुसार १६ सदस्यांपैकी भाजपा १२, काँग्रेस तीन तर बसपाच्या एका सदस्याचा समावेश आहे. भाजपाने आपल्या कोट्यातील १२ सदस्यांपैकी संदीप जाधव वगळता इतर सर्व ११ महिला सदस्यांची निवड केली आहे. यात संगीता गिऱ्हे, रिता मुळे, उषा पॅलेट, बाली हत्तीठेले, भाग्यश्री कानतोडे, स्नेहा वाघमारे, सरला नायक, मनीषा कोठे, सरिता कावरे, लता काटगाये, जयश्री वाडीभस्मे आदींचा समावेश आहे. तसेच बसपाचे जितेंद्र घोडेस्वार यांची निवड करण्यात आली आहे. मात्र काँग्रेसची नावे पुढील सभागृहात सुचविण्यात येणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी दिली.