शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

नाना गोखलेंनी केले विक्रमी मतदान

By admin | Updated: October 16, 2014 00:54 IST

नाना गोखले म्हणजे विदर्भातले बहुआयामी व्यक्तिमत्त्व. प्रामुख्याने नागपुरात आल्यावर नाना चित्रकार म्हणून प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाले असले तरी नानांच्या व्यक्तिमत्त्वाला वेगवेगळे आयाम आहेत.

नागपूर : नाना गोखले म्हणजे विदर्भातले बहुआयामी व्यक्तिमत्त्व. प्रामुख्याने नागपुरात आल्यावर नाना चित्रकार म्हणून प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाले असले तरी नानांच्या व्यक्तिमत्त्वाला वेगवेगळे आयाम आहेत. नाना साहित्याचे अभ्यासक, संस्कृतचे जाणकार, कवी, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, संगीताचे जाणकार आणि चित्रकार आहेत. याशिवाय नानांनी आज त्यांच्या वयाची १०३ वर्षे ४ महिने आणि ११ दिवस पूर्ण केले आहेत. त्यामुळे नानांच्या मतदानाबद्दल नागपूरमध्ये कुतुहलाचे वातावरण होतेच आणि नाना स्वत:ही मतदानाबद्दल आग्रही आणि उत्साही होते. सकाळी ८.३० वाजता नानांना मतदान करताना पाहून अनेकांना अभिमान वाटला आणि प्रामुख्याने तरुणाईला मतदानाची प्रेरणा त्यांच्या कृतीने आपसूकच मिळाली. सकाळी साधारणत: ढगाळ वातावरण होते. नानांना प्रकृतीचा जरा त्रास होतो पण नाना मतदानासाठी ८ वाजताच तयार होते. त्यांचा पुत्र आचार्य विवेक गोखले यांनी त्यांना व्हील चेअरवर बसवून कर्वे शिक्षण संस्था, देवनगर येथे मतदानासाठी नेले. नाना व्हीलचेअरवर मतदानासाठी जाताना पाहून अनेकांनी नानांच्या पाठोपाठ मतदान क रण्याचा निर्णय घेतला. मतदान केंद्रावर गेल्यावर १०३ वर्षाचे नाना मतदानासाठी आल्याचे कळल्यावर साऱ्यांचेच चेहरे औत्सुक्याने भरले. केंद्रावरील अधिकारी आणि पोलीस कर्मचारीही त्यांना केंद्रात घेऊन जाण्यासाठी धावले. पण नानांचे वय झाले असले तरी त्यांचा मतदानाचा उत्साह मात्र युवकांना लाजविणारा होता. नानांनी केंद्र अधिकाऱ्यांची मदत नम्रपणे नाकारली आणि मुलाच्या आधाराने व्हीलचेअरवरून उठत थोडे अंतर ते पायी चालले. त्यानंतर साधारण पाच पायऱ्या ते चढून गेले. कुणाला मतदान करायचे आहे, ते नानांनी आधीच आचार्य विवेक गोखले यांना सांगितले होते. त्याप्रमाणे मतदान करण्यासाठी विवेकजींनी त्यांना मदत केली. मतदान केल्यावर नानांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव आणि हास्य होते. पण त्यांना खूप दम लागला होता. तरीही पायी चलण्याची हिंमत त्यांनी दाखविली पण दम लागल्याने त्यांना चालणे शक्य होत नव्हते. अखेर त्यांना पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने उचलून व्हीलचेअरवर बसविण्यात आले. नाना व्हीलचेअरवर परतले तेव्हा प्रत्येकजण त्यांना मतदान केले का? असे विचारत होते आणि नाना प्रत्येकाला बोट दाखवून मतदान केल्याचे दाखवित होते.