शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नाना ढाकुलकर लेखनाचा समन्वयवादी प्रवाह

By admin | Updated: September 25, 2014 01:33 IST

साहित्य क्षेत्रातही एक सांस्कृतिक वर्चस्ववादी प्रवाह आहे. ही वर्चस्ववादी वृत्ती इतर लेखकांना कायम परिघावर पाहते आणि त्यांना दुय्यम, तिय्यम ठरवित असते. नाना ढाकुलकरांनाही याच वृत्तीशी

नागपूर : साहित्य क्षेत्रातही एक सांस्कृतिक वर्चस्ववादी प्रवाह आहे. ही वर्चस्ववादी वृत्ती इतर लेखकांना कायम परिघावर पाहते आणि त्यांना दुय्यम, तिय्यम ठरवित असते. नाना ढाकुलकरांनाही याच वृत्तीशी संघर्ष करताना उपेक्षेला सामोरे जावे लागले पण नाना म्हणजे लेखनाचे एक घराणेच आहे. लेखनातला समन्वयवादी प्रवाह म्हणजे नाना ढाकुलकर आहेत, अशी शोकसंवेदना विदर्भ साहित्य संघाचे उपाध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केली. विदर्भ साहित्य संघ, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि अ. भा. मराठी नाट्य परिषदेची नागपूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नाटककार नाना ढाकुलकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एका सभेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. जोशी बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी मनोहर म्हैसाळकर तर श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी वामन तेलंग, मदन गडकरी, प्रमोद भुसारी, प्रफुल्ल फरकासे प्रामुख्याने उपस्थित होते. जोशी म्हणाले, आर्थिक, कौटुंबिक ओढाताणीतून एखाद्या सर्जनशील लेखकाचे काय होते, याचे उदाहरण नाना आहेत. आपल्याच माणसांना आपण किंमत देत नाही, त्यांचे मूल्यमापन करीत नाही, हा वैदर्भीयांचा नतद्रष्टपणा आहे. फुले, आंबेडकरांच्या विचारांचे त्यांचे लेखन अभ्यासण्यासारखे आहे, असे ते म्हणाले. प्रमोद भुसारी म्हणाले, नानांच्या नाटकांचा अभ्यास करूनच बरेच काही शिकता आले. प्रमोद मुनघाटे म्हणाले, नाना परिवर्तनवादी, पुरोगामी लेखक होते. त्यांच्या लिखाणात चळवळींचा आशय आहे. प्रफुल्ल फरकासे म्हणाले, त्यांच्या लेखनात तंत्राचे बारकावे लाजवाब आहेत. मदन गडकरी यांनी त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. डॉ. शोभणे म्हणाले, नानांनी केवळ नाटक लिहिले नाही तर त्यांनी कथा, कादंबऱ्याही लिहिल्या. रक्षेंद्र ही त्यांची रावणावरची महत्त्वाची कादंबरी आहे पण त्यांचे मूल्यमापन करण्यात आपणच उणे पडलो. समीक्षेने त्यांच्यावर अन्याय केला, हे मान्य करावे लागेल. याप्रसंगी सर्व उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश एदलाबादकर यांनी केले.(प्रतिनिधी)