- आदिवासी विकास परिषदेने गोंड राजाला केले अभिवादन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरचे निर्माते गोंडराजे बख्त बुलंद शहा उपाख्य महिपत सिंह उईके यांचे नाव नागपूर मुख्य रेल्वे स्थानक व सीताबर्डी मेट्रो स्टेशनला देण्याची मागणी अखिल भारतीय विकास परिषदेच्या नागपूर विभागाचे अध्यक्ष दिनेश शेराम यांनी केली.
परिषदेच्या वतीने विधानभवन, सिव्हिल लाईन्स येथील गोंड रोज बख्त बुलंद शहा उपाख्य महिपत सिंह उईके यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, माजी महापौर माया इवनाते, गोंड राजे वीरेंद्र शाह, माजी उपमहापौर कृष्णराव परतेकी, विदर्भ अध्यक्ष सूर्यकांत उईके उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन यश मसराम यांनी केले तर आभार विजय परतेकी यांनी मानले. याप्रसंगी विनोद मसराम, अरविंद गेडाम, प्रशांत मडावी, रवींद्र पेंदाम, सुरेंद्र नैताम, मोनू धूर्वे, अनिकेत माकोडे, राहुल मडावी, जतिन शेराम, सौरभ मसराम, पीयूष गेडाम उपस्थित होते.
..............