शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

नाव गांधीबाग पण गांधींचेच अस्तित्व नाही

By admin | Updated: January 30, 2015 00:54 IST

इतिहासाच्या पोटात अनेक सत्य दडली असतात पण प्रत्येकवेळी खरा इतिहास समोर येत नाही. माणसे संपतात, काळ बदलतो पण इतिहास निमुटपणे साऱ्या नोंदी करीत असतो.

राजेश पाणूरकर - नागपूरइतिहासाच्या पोटात अनेक सत्य दडली असतात पण प्रत्येकवेळी खरा इतिहास समोर येत नाही. माणसे संपतात, काळ बदलतो पण इतिहास निमुटपणे साऱ्या नोंदी करीत असतो. इतिहासाकडे गंभीरपणे पाहिले आणि सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर अनेक रंजक आणि थक्क करणाऱ्या नोंदी, आठवणी आपल्याला सापडतात आणि आतापर्यंत आपण समजत होतो, ते काही तरी वेगळे असल्याचाही प्रत्यय येतो. एखाद्या वस्तीचे, स्थळाचे, शहराचे नावही तसे का आहे, याचाही इतिहास असतोच पण आपण धावपळीच्या जीवनात इतके खोलात जात नाही. नागपुरातही सेंट्रल एव्हेन्युवर गांधीबाग उद्यान आहे. या उद्यानाचे नाव म. गांधींच्या नावाने गांधीबाग झाले आहे पण येथे गांधींजींचे अस्तित्वच दिसत नाही. या उद्यानाला गांधीबाग नाव पडण्यामागे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे यत्न आहेत. राष्ट्रसंतांनीच हे उद्यान उभारले, स्वच्छता केली आणि या उद्यानाला गांधीबाग असे नाव दिले. म. गांधी यांच्या नावाने असलेले हे उद्यान आहे पण येथे म. गांधी यांचा पुतळा उभारण्यात आलेला नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म. गांधी यांचे अनुयायी होते. ३० जानेवारी १९५३ रोजी म. गांधी यांचा स्मृतिदिन नागपुरात मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला. राष्ट्रसंतांनीच हा कार्यक्रम आयोजित केला होता. राष्ट्रसंतांनी गांधीजींची पुण्यतिथी त्यांच्या विचारांवर अमल करून साजरी करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी तत्कालीन लेंडी तलाव परिसराची निवड केली. या परिसरात त्यावेळी खूप घाण होती आणि तेथे छोटासा तलाव होता. लोक येथे शौचासाठी येत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी, अनारोग्य पसरले होते. म. गांधी स्वच्छतेचे पुजारी होते. परिसर स्वच्छ आणि प्रसन्न ठेवण्यासाठी त्यांनी अनेकांना प्रेरित केले. त्यांच्या याच विचाराने प्रभावित होऊन राष्ट्रसंतांनी लेंडी तलाव परिसराची निवड म. गांधींच्या पुण्यतिथीसाठी केली आणि आपल्या शिष्यपरिवारासह या तलावाची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रसंतांनी १५०० स्वयंसेवकांच्या सहकार्याने हा तलाव परिसर स्वच्छ केला. यासाठी सर्व नागरिकांनी येथे श्रमदान केले. त्यांनी दलदलीने आणि घाणीने भरलेला हा तलाव बुजविला आणि परिसर स्वच्छ केला. तेथे वृक्षांची लागवड केली आणि उद्यान तयार झाले. जो परिसर घाण आणि दुर्गंधीने भरला होता तेथे मनाला आल्हाद देणारे उद्यान तयार झाले. ज्या परिसरात नाक दाबून जावे लागत होते तेथे आता शांतता, स्वच्छता दिसायला लागली. गांधीजींना शांतता प्रिय होती. त्यामुळेच राष्ट्रसंतांनी या उद्यानाला गांधीबाग असे नाव दिले. तेव्हापासून या उद्यानाला आणि परिसरालाही गांधीबाग असेच नाव अद्यापपर्यंत आहे. पण येथे अजूनही म. गांधींचा पुतळा स्थापन करण्यात आला नाही. महापालिकेचेही या बाबीकडे दुर्लक्ष झाले. गांधीजींच्या नावाने असणाऱ्या उद्यानात गांधीजींनाच शोधण्याची वेळ येथे आली आहे. गांधीबाग हे नामकरण करण्यापूर्वी राष्ट्रसंतांच्या प्रेरणेने २९ जानेवारी १९५३ रोजी एका प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. आज गांधीजींची पुण्यतिथी आहे. पण गांधीबागेत मात्र म. गांधींचे अस्तित्व शोधूनही सापडत नाही. गांधीजींच्या पुण्यतिथीसाठी त्यावेळी प्रांतीय सरकार, सुधार प्रन्यास, सी. पी. अँड बेरार प्रॉपर्टीज कंपनी आणि सर्व धर्माच्या नागरिकांनी सहकार्य केले होते. टेलिफोन, पोस्ट आॅफिस, दिव्यांचे खांब, मॅजिस्ट्रेट निवास, कार्यकर्त्यांसाठी तंबू, राहुटी, उपयुक्त दुकाने, प्रदर्शन अशी व्यवस्था येथे सर्वांच्या सहकार्याने करण्यात आली. कार्यक्रमासाठी मान्यवरांचे संदेशही आले. यात सरदार वल्लभभाई पटेल, राजगोपालाचारी, कैलाशनाथ काटजू, काकासाहेब गाडगीळ, डॉ. पट्टाभिसीतारामय्या, स्वामी रामानंदतीर्थ, महावीर त्यागी, लोकनायक बापूजी अणे, जे. सी. कुमारप्पा, सेठ गोविंददास, राजकुमारी अमृत कौर आदींचा समावेश होता. राष्ट्रसंतांचे गुरु योगीराज स्वामी, सीतारामदास महाराज, संत दामोदरदास महाराज हे दोन आठवड्यांपूर्वी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. वामनराव लोहकरे, रघुनाथराव पत्तरकिने यांनीही यावेळी हजेरी लावली. प्रभातफेरी ज्या मार्गावरून नेण्यात आली, त्या मार्गावर सडासंमार्जन करण्यात आले, रांगोळ्या काढण्यात आल्या. प्रभातफेरीत सायकलस्वार स्वयंसेवक सहभागी झाले. स्वागतद्वार उभारण्यात आले, भगवे फेटे घातलेली भजन मंडळे राष्ट्रीय भजने सादर करीत होती. मुख्य रथावर स्वामी सीतारामदास महाराज आरुढ झाले आणि मागे म. गांधी यांचे भव्य तैलचित्र लावण्यात आले. ३० जानेवारी रोजी गांधी स्मृतिदिनानिमित्त मार्गदर्शक भाषणे, सामुदायिक ध्यान, व्यायाम, योगासने आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन तीन दिवस करण्यात आले होते. राष्ट्रसंतांच्या प्रेरणेने आणि म. गांधी यांच्या विचारातून या परिसराचा कायापालट झाला. पण या दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमा येथे उभारण्यात मात्र आमचाच नतद्रष्टपणा आड आला, असे म्हणावे लागेल. महापालिकेने पुढाकार घ्यावा१९५३ साली गांधीबागेत झालेल्या कार्यक्रमाचे आपण स्वत: एक साक्षीदार आहोत आणि त्याची छायाचित्रेही आपल्याजवळ उपलब्ध आहेत. राष्ट्रसंतांनीच या परिसराचे नाव गांधीबाग असे ठेवले. संपूर्ण परिसरात सायकलने फिरुन ते पाहणी करायचे. आज गांधीबागेत मात्र राष्ट्रसंत आणि म. गांधी यांचा उल्लेखही नसल्याची खंत वाटते. महापालिकेजवळ यासंदर्भातील प्रस्ताव उपलब्ध आहेत. महापालिकेने पुढाकार घेऊन राष्ट्रसंत आणि म. गांधी यांच्या पुतळ्याची स्थापना करण्याचा निर्णय म. गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त करावा, असे मत गजानन भिसेकर यांनी व्यक्त केले.