शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दूरदर्शनच्या नावावर गंडा

By admin | Updated: September 19, 2015 03:50 IST

भारत सरकारच्या प्रसार भारती विभागाच्या (दूरदर्शन) नावावर बोगस जाहिरात प्रसिद्ध करू न विदर्भातील अनेक बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून...

बोगस जाहिरात : नोकरीच्या नावावर बेरोजगारांची फसवणूक नागपूर : भारत सरकारच्या प्रसार भारती विभागाच्या (दूरदर्शन) नावावर बोगस जाहिरात प्रसिद्ध करू न विदर्भातील अनेक बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यात अनेक बेरोजगारांना हजारो रुपयांनी गंडा घालण्यात आला आहे. यासंबंधी अलीकडेच भंडारा जिल्ह्यातील वासेरा येथील सौरभ झंजाळ या बेरोजगार तरुणाने ‘लोकमत’ कडे तक्रार करू न या संपूर्ण प्रकरणाचा भंडाफोड केला आहे.सौरभ हा शेतकऱ्याचा मुलगा आहे. इतर तरुणांप्रमाणे त्यानेही वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली जाहिरात पाहून दूरदर्शनवरील ‘किसान पत्रकार’ पदासाठी अर्ज केला. त्यावर त्याला संबंधित व्यक्तीने भारत सरकार व दूरदर्शनचा लोगो असलेल्या लेटरहेडवर संचालक सुरेश पाटील यांच्या स्वाक्षरीने नियुक्ती पत्र पाठवून १२ हजार ५०० रुपये बँकेत जमा करण्यास सांगितले. ते नियुक्ती पत्र पाहून सौरभ हा कमालीचा आनंदित झाला. त्यामुळे त्याने कोणतीही चौकशी न करताना ८ सप्टेबर २०१५ रोजी भंडारा जिल्ह्यातील जाम येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत एम. आर. राजेशकुमार या नावावरील बँक खाते क्र. २०२७९१३९५५९ यावर १२ हजार ५०० रुपये जमा केले. तत्पूर्वी सौरभला नियुक्तीपत्रसह पाठविलेल्या दुसऱ्या पत्रात त्याला २५ हजार ५०० रुपये प्रतिमाह वेतन मिळणार असल्याचे आमिष दाखवून नि:शुल्क आवास, कॅमेरा, मोटरसायकल, मोबाईल फोन, इंटरनेट, वाहनभत्ता, एटीएम, मोफत आरोग्य सुविधा व प्रशिक्षणाला जाण्यासाठी रेल्वे तिकीट देण्याचे प्रलोभन दाखविण्यात आले होते. मात्र काहीच दिवसांत सौरभला मोबाईल क्र. ०७६३३४७१०३८ यावरू न फोन आला आणि राजेशकुमार या व्यक्तींच्या खात्यावर पुन्हा १५ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. यावेळी मात्र सौरभने पैसे न भरता थेट नागपूर येथील दूरदर्शनच्या कार्यालयात धाव घेतली.