शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर कोट्यवधींची उलाढाल : अनेक दुकाने ‘हाऊसफुल्ल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 00:39 IST

दिवाळीतील एक महत्त्वाचा दिवस मानण्यात येणाऱ्या धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर शहरातील सराफा बाजारात प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. दिवसभर शहरातील दागिन्यांच्या दुकानांमध्ये गर्दी दिसून आली. शहरात सोन्या-चांदीची कोट्यवधींची उलाढाल झाली. अनेक दुकानांमध्ये तर पाय ठेवायलादेखील जागा नव्हती. सोन्याचा भाव ३२ हजार ७०० रुपये असतानादेखील ग्राहकांच्या गर्दीमुळे सोन्याला झळाळीच मिळाल्याचे चित्र होते.

ठळक मुद्देसराफा बाजारासाठी ‘गोल्डन डे’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळीतील एक महत्त्वाचा दिवस मानण्यात येणाऱ्या धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर शहरातील सराफा बाजारात प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. दिवसभर शहरातील दागिन्यांच्या दुकानांमध्ये गर्दी दिसून आली. शहरात सोन्या-चांदीची कोट्यवधींची उलाढाल झाली. अनेक दुकानांमध्ये तर पाय ठेवायलादेखील जागा नव्हती. सोन्याचा भाव ३२ हजार ७०० रुपये असतानादेखील ग्राहकांच्या गर्दीमुळे सोन्याला झळाळीच मिळाल्याचे चित्र होते.यंदा दिवाळी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आली आहे. पहिल्याच आठवड्यात पगार व बोनस मिळाल्याने ग्राहकांची बाजारात गर्दी दिसून आली. व्यापाऱ्यांनीदेखील ग्राहकांची पसंती जपण्याचा पूर्ण प्रयत्न केला. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने व चांदीला मोठ्या प्रमाणात मागणी होती. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा बाजारात मंगळसूत्र व चेन यांना जास्त मागणी होती. महाल, इतवारीतील काही दुकानांत तर ग्राहकांना रांगा लावाव्या लागल्या. ग्राहकांची होणारी गर्दी लक्षात घेता, दागिन्यांची दुकाने सकाळी ९ च्या सुमारासच उघडली व रात्री उशिरापर्यंत खरेदी-विक्री सुरूच होती.शहरात सोमवारी सोन्याचा भाव ३२ हजार ७०० रुपये (प्रति १० ग्रॅम) तर चांदीचा भाव ३९ हजार रुपये किलो इतका होता. ग्राहकांचा भर दागिन्यांवर जास्त होता. दागिन्यांचा उपयोगदेखील होतो व दिवाळीवर यांची खरेदी शुभ मानण्यात येते, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

प्रतिमांचीदेखील मागणीग्राहक वास्तुशास्त्रानुसारदेखील खरेदीवर भर देताना दिसून आले. घरांमध्ये ठेवण्यासाठी ठोस मूर्ती व प्रतिमा याची मागणी होती. त्या हिशेबाने व्यापाऱ्यांनीदेखील तशी तयारी करून ठेवली होती. सोन्याच्या १ ते २ इंची मूर्ती मोठ्या प्रमाणात विकल्या गेल्या तर माता लक्ष्मी व कुबेर यांच्या चांदीच्या प्रतिमांची सर्वात जास्त विक्री झाली. १ हजार ते ३० हजार रुपयांपर्यंत यांचा दर होता. सर्वात जास्त विक्री ही ५ ते १० हजार रुपयांच्या प्रतिमा व मूर्तींची झाली. तसेच सोन्या-चांदीच्या नाण्यांनादेखील चांगली मागणी होती, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.‘इलेक्ट्रॉनिक्स’च्या दुकानांमध्येदेखील गर्दीयंदाची दिवाळी विशेष ठरावी, अशी अनेकांची इच्छा आहे. त्यामुळे बऱ्या
च जणांनी ‘इलेक्ट्रॉनिक’ वस्तूंच्या खरेदीवरदेखील भर दिला. टीव्ही, फ्रीज, मोबाईल, लॅपटॉप, वॉशिंग मशीन, कॅमेरा, कॉम्प्युटर, होम थिएटर इत्यादी उपकरणांच्या खरेदीसाठी शोरुम्समध्ये गर्दी झाली होती. आकर्षक ‘फायनान्स स्कीम्स’ व ‘एक्सचेंज’ सुविधेमुळे ग्राहकांची पावले मोठ्या प्रमाणात दुकानांकडे वळली.वाहनांना विशेष मागणीसोमवारी वाहन बाजारातदेखील उत्साह दिसून आला. सायकल, दुचाकी, चारचाकी खरेदीसाठी सकाळपासूनच विविध ‘शोरुम्स’मध्ये गर्दी दिसून आली. एकाच दिवसात वाहन बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली व हजारांहून अधिक वाहनांची विक्री झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली.भांडेबाजारदेखील चमकलाधनत्रयोदशीच्या दिवशी अनेक नागरिक भांड्यांचीदेखील खरेदी करतात. बाजारपेठांमधील भांड्याच्या दुकानांमध्ये पितळ, तांब्याची भांडी खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून आली. सोबतच विविध धातूंपासून बनलेल्या मूर्ती, प्रतिमा, थाळ्या, कलश, पाण्याची भांडी इत्यादींना मागणी होती. दिवाळीच्या निमित्ताने कपडा बाजारातदेखील उत्साह दिसून आला. खरेदीसाठी बाहेर निघालेल्यांपैकी अनेकांची पावले कपड्यांच्या बाजाराकडे वळल्याचे दिसून आले. विविध ठिकाणी असलेल्या ‘आॅफर्स’मुळे तर गर्दी आणखी वाढली होती. 

 

 

टॅग्स :DiwaliदिवाळीMarketबाजार