शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोला नागपूरकर तरुणांची ‘अ‍ॅलर्जी’

By admin | Updated: November 2, 2016 02:43 IST

शहराच्या विकासातील महत्त्वाचा प्रकल्प म्हणून ज्याकडे पाहिले जात आहे त्या मेट्रो रेल्वेसाठी सुरू असलेल्या कर्मचारी भरती

राज्य शासनाचे धोरणच अस्पष्ट : मराठी भाषेचे ज्ञानही आवश्यक नाहीनागपूर : शहराच्या विकासातील महत्त्वाचा प्रकल्प म्हणून ज्याकडे पाहिले जात आहे त्या मेट्रो रेल्वेसाठी सुरू असलेल्या कर्मचारी भरती प्रक्रियेत स्थानिक तरुणांना मात्र डावलले जात आहे. या प्रकल्पाच्या भरती प्रक्रियेबाबत राज्य शासनाचे धोरणच स्पष्ट नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, या भरतीसाठी मराठी भाषेचे ज्ञान असायलाच हवे अशी कुठलीही अट नाही. त्यामुळे शहराबाहेरच्या युवकांना नोकरी मिळताना बघून शहरातील युवक मात्र निराश होत आहेत. केंद्र शासनाने नागपूरसह बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि अहमदाबाद येथे मेट्रो रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांसाठी कर्मचारी भरती करताना महाराष्ट्र वगळता इतर सर्व राज्यात स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक करण्यात आले आहे. या अटीमुळे त्या राज्यातील स्थानिक तरुणांना नोकरी मिळत आहे. परंतु महाराष्ट्राच्या ‘उदार’ धोरणामुळे येथील स्थानिक तरुण मात्र नोकरीपासून वंचित आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनतर्फे काही दिवसांआधी विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली. परंतु या पदांसाठी अर्ज करणाऱ्यांकरिता मराठीचे ज्ञान आवश्यक असल्याची कुठलीही अट ठेवण्यात आली नाही. अशी अट असती तर निश्चितच स्थानिक तरुणांना यात प्राधान्य मिळाले असते. याचा फायदा परप्रांतीय तरुणांना होत आहे. इतर राज्यातील अनेक अभियंत्यांना महाराष्ट्रातील मेट्रो प्रोजेक्ट्समध्ये नोकरी मिळत आहे. नागपूरचा विचार केला तर येथे ५० टक्के स्थानिक तरुणांना नोकरी दिल्याचा दावा केला जात आहे. परंतु वास्तविकता वेगळी आहे. काही कंत्राटदार कंपन्यांनी स्थानीय कामगारांनाच काय ते छोटे-मोठे काम दिले आहे. यातल्याच एका कंपनीने तर हैदराबाद येथून कामगारांना येथे बोलावले आहे. शहरातील कोणत्याच इंजीनिअरिंग, पॉलिटेक्निक कॉलेजेसमध्ये नागपूर मेट्रोकडून कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यात आले नाहीत. (प्रतिनिधी)... तर मिहानसारखी गत होईलमिहान प्रकल्पाच्या वेळीही स्थानिक तरुणांना रोजगाराचे स्वप्न दाखवण्यात आले होते. मिहानमधील कंपन्या स्थानिक तरुणांनाच नोकरी देतील, असे दावे केले जात होते. राज्यपालांनी स्वत: यात लक्ष घातले होते. त्यांच्या निर्देशानुसार मिहानमध्ये नोकरी मिळविण्याच्या दृष्टीने विविध अभ्यासक्रमही सुरू करण्यात आले होते. परंतु इतक्या खटाटोपानंतरही किती स्थानिक तरुणांना नोकरी मिळाली, हे सांगणे कठीण आहे. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पातील कर्मचारी भरतीचे चित्रही याहून वेगळे नाही.