शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंचलित मीटर वाचनात नागपूरची आघाडी

By admin | Updated: April 11, 2017 02:20 IST

आपण वापरलेल्या विजेचे अचूक व वेळेत बिल मिळावे, अशी वीज ग्राहकांची अपेक्षा असते.

महावितरण : वीज बिलात अचूकता नागपूर : आपण वापरलेल्या विजेचे अचूक व वेळेत बिल मिळावे, अशी वीज ग्राहकांची अपेक्षा असते. ही बाब लक्षात घेऊन महावितरणने सुरुवातीपासूनच अद्ययावत पद्धतीचे अचूक मीटर रीडिंग व्हावे, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवनवीन प्रयोगांची अंमलबजावणी केली आहे. यापैकी सर्वाधिक नवीन तंत्रज्ञान असलेल्या स्वयंचलित मीटर वाचन (एएमआर) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात नागपूर परिक्षेत्राने राज्यात आघाडी घेतली आहे. महावितरणने राज्यातील उच्च दाब ग्राहकांसाठी स्वयंचलित मीटर वाचनाद्वारे (एएमआर) बिलिंग यंत्रणा सुरू केली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या वीज बिलात अचूकता आली आहे. महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रात नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गोंदिया या पाच परिमंडलाचा समावेश असून, ही पाचही परिमंडल मिळून एकूण २५५१ उच्च दाब ग्राहक आहेत. यापैकी मार्च २०१७ च्या वीज वापरापोटी २,१९५ ग्राहकांकडील मीटरचे वाचन स्वयंचलित झाले असून हे प्रमाण तब्बल ८६ टक्के आहे, तर त्याखालोखाल औरंगाबाद परिक्षेत्रातील प्रमाण ७६.८ टक्के, कल्याण परिक्षेत्रात ७५.१ टक्के तर पुणे परिक्षेत्रात हे प्रमाण ७४.९ टक्के आहे. महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक प्रसाद रेशमे यांनी २ आॅक्टोबर २०१६ रोजी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आधुनिकीकरण आणि अचूकता यावर विशेष भर दिला आणि त्यामुळेच नागपूर परिक्षेत्राने राज्यात स्वयंचलित मीटर वाचन यंत्रणेच्या वापरात राज्यात आघाडी घेतली आहे. याशिवाय नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता रफीक शेख, चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, गोंदिया परिमंडलाचे मुख्य अभियंता जिजोबा पारधी, अमरावती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी आणि अकोला परिमंडलाचे वर्तमान मुख्य अभियंता अरविंद भादीकर व पूर्वीचे प्रभारी मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी त्यांच्या परिमंडलातील अधीक्षक अभियंते आणि चाचणी मंडलाचे अधीक्षक अभियंता बंडू वासनिक यांच्यासह सर्वांनी प्रयत्न केले.(प्रतिनिधी)बिलिंगमध्येही नागपूर परिक्षेत्र पुढे महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील उच्च दाब ग्राहकाकडील मीटरचे वाचन दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी होऊन पुढील पाच दिवसात त्यांचे बिलिंग होऊन ते ग्राहकांच्या ई-मेलवर मिळायलाच हवे यावर काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू असल्याने ३१ मार्च रोजी मीटर वाचन करून ५ एप्रिलपर्यंत सर्व ग्राहकांना त्यांचे वीज देयक ई-मेल च्या माध्यमातून पाठविण्यात आले आहेत. त्यानुसार मार्च महिन्याच्या बिलिंगमध्ये नागपूर परिक्षेत्राने सर्व २५५१ ग्राहकांचे बिंलिंग यशस्वीरीत्या करीत राज्यात आघाडी घेतली आहे. नागपूरपाठोपाठ पुणे परिक्षेत्राने ९९.८९ टक्के, औरंगाबाद परिक्षेत्राने ९९.३८ तर कल्याण परिक्षेत्राने ९८.९७ टक्के ग्राहकांचे बिलिंग केले आहे.