शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नागपूरच्या ज्योती पटेलांची इंडिया गेट ते गेट वे आॅफ इंडिया मोहिम फत्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 10:23 IST

स्थानिक प्रतिभावान सायकलपटू ज्योती पटेल यांनी आपल्या कामगिरीने आणखी एक मानाचा तुरा शिरपेचात रोवला आहे. जीटूजी मोहिमेअंर्तगत ज्योती यांनी दिल्लीतील इंडिया गेट ते मुंबईतील गेट वे आॅफ इंडिया असा १४६० किमी सायकल प्रवास सहा दिवसांत पूर्ण केला.

ठळक मुद्देसहा दिवसांत १४६० किमी सायकल प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्थानिक प्रतिभावान सायकलपटू ज्योती पटेल यांनी आपल्या कामगिरीने आणखी एक मानाचा तुरा शिरपेचात रोवला आहे. जीटूजी मोहिमेअंर्तगत ज्योती यांनी दिल्लीतील इंडिया गेट ते मुंबईतील गेट वे आॅफ इंडिया असा १४६० किमी सायकल प्रवास सहा दिवसांत पूर्ण केला.३८ वर्षांच्या ज्योती व्यवसायाने इंटेरियर डिझायनर आहेत. मागच्यावर्षी १६ डिसेंबर रोजी मोहिमेला दिल्लीतून सुरुवात केल्यानंतर सहाव्या दिवशी त्यांनी मुंबई गाठली. या प्रवासात त्यांच्यासमवेत अन्य पाच महिला सायकलपटू होत्या. दररोज त्यांनी २५० किमी सायकल प्रवास केला. या कालावधीत जयपूर, भीलवाडा, खेरवडा (राजस्थान), बडोदा (गुजरात), तालश्री (महाराष्ट्र) येथे रात्रीचा मुक्काम केला. २१ डिसेंबर रोजी सायंकाळी त्या गेट वे आॅफ इंडिया येथे दाखल झाल्या.जीटूजी सायकल मोहिमेचे आयोजन दिल्ली रँडोनियर क्लबने केले होते. या मोहिमेचा मुख्य हेतू बालश्रम तसेच पायी चालणाऱ्यांच्या सुरक्षेबद्दल जागरुकता निर्माण करणे हा होता.सायकलिंगमध्ये एका कॅलेंडर वर्षांत २००, ३००, ४००, ६०० असा एकूण १५०० किमी सायकल प्रवास करणाऱ्यांना ‘सुपर रँडोनियर’ असे संबोधण्यात येते.ज्योती या एका कॅलेंडर वर्षांत ३००० किमी अंतर पूर्ण करणाऱ्या मध्य भारतातील पहिल्या सुपर रँडोनियर ठरल्या आहेत. यादरम्यान त्यांनी देशातील रायपूर, हैदराबाद, विजयवाडा, पचमढी अशा विविध ठिकाणी सायकल चालविली. डिसेंबर २०१६ मध्ये त्यांनी नागपूर-रायपूर हे ६०० किमी अंतर न थांबता विक्रमी वेळेत गाठले होते. यंदा छत्तीसगड पर्यटन मंत्रालयाच्यावतीने २६ ते ३० जानेवारीदरम्यान ४०० किमी सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून ज्योती या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ‘रेस अ‍ॅक्रॉस अमेरिका’ या सायकल प्रवासातील अनुभवी खेळाडू डॉ. अमित समर्थ हे ज्योती यांचे प्रशिक्षक आहेत.‘‘महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत. क्रीडा क्षेत्रातही महिलांना अनेक संधी आहेत. वायू प्रदूषण, वाहतूक समस्या, पार्किंग समस्या, आरोग्याचे प्रश्न आदी समस्यांवर तोडगा म्हणून सायकलचा वापर बहुपयोगी आहे.’’- ज्योती पटेल, सायकलपटू.

टॅग्स :Sportsक्रीडा