शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर फॉर्म्युल्याने वेधले राज्याचे लक्ष

By admin | Updated: October 26, 2014 00:17 IST

राज्यात कोण मोठा ‘भाऊ’ यावरून युतीत तेढ निर्माण झाली असताना नागपूर जिल्हा परिषदेत दोन्ही पक्षानी युती करून सत्ता स्थापन केली. युती तुटल्यावर राज्यात दोन्ही पक्ष परस्परांविरुद्ध लढत

जि.प.मधील युती कायम : सावनेरात भाजपने दिला होता सेनेला पाठिंबागणेश हूड - नागपूरराज्यात कोण मोठा ‘भाऊ’ यावरून युतीत तेढ निर्माण झाली असताना नागपूर जिल्हा परिषदेत दोन्ही पक्षानी युती करून सत्ता स्थापन केली. युती तुटल्यावर राज्यात दोन्ही पक्ष परस्परांविरुद्ध लढत असताना सावनेरमध्ये मात्र भाजपने सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. ही दोन्ही उदाहरणे आता सत्ता स्थापनेसाठी पुन्हा एकत्र येऊ घातलेल्या भाजप-सेनेसाठी आदर्श पर्याय म्हणून लक्ष केंद्रित करणारी आहेत. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपने राज्यात जागा वाढवून मागितल्या. राज्यात आपणच मोठा भाऊ असे म्हणत सेनेने हा प्रस्ताव फेटाळला. यातून दोन्ही पक्षात तेढ निर्माण झाली. युती तुटणार अशी चर्चा राज्यभरात सुरू असताना नागपूर जि.प.तील अध्यक्ष व विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडणुका होत्या. दोन्ही पक्षातील ताणतणाव लक्षात घेता जि.प.तील भाजप-सेना युती तुटेल व युतीच्या हातून सत्ता जाईल, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी सामंज्यस्याची भूमिका घेत युती कायम ठेवून सत्ता अबाधित राखली. काही दिवसातच राज्य पातळीवरील युती तुटली. दोन्ही पक्ष परस्परांच्या विरोधात उभे ठाकले. नागपूर जिल्ह्यातही भाजप उमेदवारांच्या विरोधात सेनेचे उमेदवार रिंगणात होते. तांत्रिक कारणामुळे सावनेरमध्ये भाजप उमेदवार सोनबा मुसळे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरला. या कठीण प्रसंगी भाजपने वेगळा विचार न करता सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. निवडणुका झाल्यानंतर दोन्ही पक्ष सत्ता स्थापन करण्यासाठी पुन्हा एकत्र येत असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणुकीपूर्वीच नागपूर जिल्ह्यात दोन्ही पक्षातील आपसी सामंज्यस्याचे दर्शन घडविणाऱ्या वरील दोन घटना महत्त्वपूर्ण ठरतात. बदलत्या राजकीय परिस्थितीत हाच नागपूर फॉर्म्युला राज्यात सत्ता स्थापनेसाठी दोन्ही पक्षासाठी आदर्श ठरू शकणार असल्याची राजकीय पातळीवर चर्चा आहे. (प्रतिनिधी)