शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना योद्ध्यांचे नागपूरकर सदैव ऋणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 00:22 IST

कोरोनाच्या संकटकाळात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशासन व इतर शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी दिवसरात्र कर्तव्य बजावत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता अहोरात्रपणे सेवा देत आहे. त्यांच्या कार्याची तुलनाच होऊ शकत नाही, कोरोना योद्ध्यांचे नागपूरकर सदैव ऋणी असल्याचे प्रतिपादन महापौर संदीप जोशी यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या संकटकाळात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशासन व इतर शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी दिवसरात्र कर्तव्य बजावत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता अहोरात्रपणे सेवा देत आहे. त्यांच्या कार्याची तुलनाच होऊ शकत नाही, कोरोना योद्ध्यांचे नागपूरकर सदैव ऋणी असल्याचे प्रतिपादन महापौर संदीप जोशी यांनी केले.बुधवारी महापौरांनी शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्र (आरपीटीएस) आणि व्हीएनआयटी येथील विलगीकरण कक्षाला भेट दिली. याप्रसंगी उपमहापौर मनिषा कोठे, स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, नगरसेविका डॉ. परिणिता फुके, झोन सभापती अमर बागडे, शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेवक किशोर जिचकार, नगरसेविका वर्षा ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.यावेळी संदीप जोशी यांनी विलगीकरणातील नागरिकांची विचारपूस करून जेवण आणि इतर सर्व सुविधांसंबंधी माहिती जाणून घेतली. तक्रार असल्यास त्वरित संबंधितांना कळविण्याचेही आवाहन त्यांनी यावेळी केले. आज आषाढी एकादशी निमित्ताने विलगीकरणातील सर्व नागरिकांसाठी राधास्वामी सत्संग न्यासतर्फे विशेष फराळ देण्यात आल्याची माहिती दिली.

टॅग्स :Mayorमहापौरcorona virusकोरोना वायरस बातम्या