शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जि.प. काढणार आशा स्वयंसेविकांचा विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 10:24 IST

गावोगावी घरोघरी फिरणाऱ्या आशा स्वयंसेविकेवर येणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने त्यांचा वैयक्तिक विमा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्दे१६०० आशा स्वयंसेविका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा कणा असलेल्या आशा स्वयंसेविका सुविधेच्या बाबतीत उपेक्षित आहे. ग्रामीण भागातील महिला व बालकांच्या आरोग्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. गावोगावी घरोघरी फिरणाऱ्या आशा स्वयंसेविके वर येणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने त्यांचा वैयक्तिक विमा काढण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात जवळपास १६०० आशा स्वयंसेविका आहे. आशा स्वयंसेविकेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला शासनामार्फत देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या आरोग्यविषयक सेवा पोहचविण्याचे काम करतात. खेड्यापाड्यात घरोघरी जाऊन महिला, बालकांना आरोग्य केंद्राशी जोडतात. गरोदर माता व बालकांच्या बाबतीत विशेष काळजी घेतात. शासनातर्फे आरोग्यविषयक राबविण्यात येणाऱ्या योजना घरोघरी त्यांच्यामार्फत पोहचतात. कधी महामंडळाच्या बसने, कधी पायी त्या काम करतात. दुर्गम, आदिवासी भागातील आरोग्य खऱ्या अर्थाने त्यांच्यामुळे टिकवून आहे. कुपोषणाच्या समस्येवर आशास्वयंसेविकेचे काम महत्त्वपूर्ण आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आशा स्वयंसेविकेच्या कार्याची दखल घेत, गेल्यावर्षी त्यांचा अपघात विमा काढला होता. जिल्हा परिषदेने राबविलेल्या योजनेच्या धर्तीवर केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात ही योजना लागू केली. यावर्षी जिल्हा परिषदेने अपघाताबरोबरच नैसर्गिक मृत्यू झाल्यासही विम्याचा लाभ मिळवून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक आशा स्वयंसेविकेचा ३३० रुपयांचा विमा काढण्यात येणार आहे. यासंदर्भातील निर्णय आरोग्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला. विम्याच्या रक्कमेची तरतूद सेसफंडातून करण्यात येणार असल्याचे आरोग्य सभापती शरद डोणेकर यांनी सांगितले.

टॅग्स :Governmentसरकार