शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

...तर नागपूर देशाचे क्रीडा ‘हब’ होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 07:05 IST

शहरात ३५० मैदाने तयार करणार असल्याचे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले आहे. नवीन पिढीला खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध झाली तर निश्चितच उपराजधानीमध्ये क्रीडासंस्कृती निर्माण होईल.

ठळक मुद्देखासदार क्रीडा महोत्सवाचा थाटात समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात ३५० मैदाने तयार करणार असल्याचे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले आहे. नवीन पिढीला खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध झाली तर निश्चितच उपराजधानीमध्ये क्रीडासंस्कृती निर्माण होईल. येथून आणखी चांगले, दर्जेदार खेळाडू घडतील व नागपूर देशाचा क्रीडा ‘हब’ म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास ‘आयसीसी’चे (इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल) अध्यक्ष अ‍ॅड.शशांक मनोहर यांनी व्यक्त केला. खासदार क्रीडा महोत्सवाचा शुक्रवारी थाटात समारोप झाला. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.मानकापुर क्रीडा संकुल येथे झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खा.विकास महात्मे, माजी खासदार दत्ता मेघे, आ.सुधाकर कोहळे, अनिल सोले, सुधाकर देशमुख, मिलिंद माने, माजी आमदार आशिष जयस्वाल, अशोक मानकर, महापौर नंदा जिचकार, मनपाचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी प्रामुख्याने उपस्थित होते. शहरात आवश्यक त्या प्रमाणात क्रीडांगणे तयार झाली तर खरोखरच क्रीडाक्षेत्राला एक वेगळी दिशा मिळेल. नितीन गडकरी हे जे बोलतात ते करतात. इतर नेत्यांप्रमाणे केवळ आश्वासने देत नाहीत. नव्या खेळाडूंना मंच प्रदान करणारा हा क्रीडा महोत्सव असाच सुरू ठेवावा, असे प्रतिपादन अ‍ॅड. मनोहर यांनी केले.तत्पूर्वी संदीप जोशी यांनी प्रास्ताविकातून महोत्सवातील एकूण कामगिरीवर प्रकाश टाकला. दरम्यान, यावेळी क्रीडा क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या १९ क्रीडापटूंना मान्यवरांच्या हस्ते क्रीडाभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार सोहळ्यानंतर प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम याच्या ‘लाईव्ह कॉन्सर्ट’ने कार्यक्रमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.

सोनू निगमने ‘मौसम’ केला ‘मस्ताना’‘यंगिस्तान’पासून ते थेट जुन्या पिढीतील नागरिकांना वेड लावणारा बॉलिवूडचा प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम याचा शुक्रवारी खासदार क्रीडा महोत्सवात आयोजित ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’ नागपूरकर रसिकांसाठी अविस्मरणीय ठरला. अगोदरच पावसामुळे ‘रोमँटिक’ झालेल्या वातावरणात ‘दिवाना’ बनून अवतरलेल्या सोनू निगमच्या स्वरधारांनी सभागृहातील प्रत्येक रसिक अक्षरश: ‘मस्ताना’ झाला. रसिकांनी खचाखच भरलेल्या मंतरलेल्या वातावरणात ‘क्रेझी दिल मेरा’ म्हणत त्याने सप्तसुर लावला अन् स्वरमैफिलीत आलेला प्रत्येक ‘मुसाफिर’ संगीताच्या दुनियेत हरविला. गायनाच्या क्षेत्रात कितीही बदल झाला असला तरी आपल्या स्वरवैभवाने आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असलेल्या सोनू निगमने आपल्या ‘रुमानी’ आवाजाने नागपूरकरांना संगीताची एक वेगळीच अनुभूती दिली. सोनू नागपुरात बेफाम गायला आणि त्याच्या गायनाच्या कैफात आकंठ बुडालेल्या रसिकप्रेक्षकांनी कधी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करीत तर कधी त्याच्या शब्दावर ताल धरीत त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘दिवाना तेरा...’, ‘हस मत पगली प्यार हो जाएगा’, ‘कभी अलविदा ना कहना’, ‘अब मुझे रात दिन..’ या गाण्यांनी रसिकांना वेड लावले. तर ‘सूरज हुआ मध्धम’ या गाण्याने अनेकांच्या ह्रद्यांच्या तारा वाजायला सुरुवात झाली. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला कार्यक्रम होत असल्याने सोनूने ‘मेरा रंग दे बसंती चोला..’चे सादरीकरण केले आणि चहूबाजूने ‘भारत माता की जय’चे नारे लागले. ‘कॉन्सर्ट’मध्ये अनेक एकाहून एक ‘हीट’ गाणी म्हणत उपस्थितांचा जोश आणखी वाढविला. मान्या नारंग हिने ‘कॉन्सर्ट’च्या सुरुवातीला ‘चली रे..’,‘लैला ओ लैला’ ही गाणी गायली.

टॅग्स :Sonu nigamसोनू निगम