शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर होणार स्मार्ट अन् सुरक्षित

By admin | Updated: October 19, 2015 02:45 IST

स्मार्ट सिटीची संकल्पना राबविताना शहरातील सुंदर इमारती, गुळगुळीत रस्ते, पिण्याचे पाणी, आदी सुविधांसोबतच घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्याचा पुनर्वापर आदी

देवेंद्र फडणवीस : रिंगरोड काँक्रिटीकरणाचा शुभारंभ व जलकुंभाचे लोकार्पणनागपूर : स्मार्ट सिटीची संकल्पना राबविताना शहरातील सुंदर इमारती, गुळगुळीत रस्ते, पिण्याचे पाणी, आदी सुविधांसोबतच घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्याचा पुनर्वापर आदी संवर्धनाच्या उत्कृ ष्ट योजनांमुळे शहराला सुंदरपण येते. या सर्व सुविधा उपलब्ध करून शहराला देशातील सर्वोत्तम स्मार्ट व सुरक्षित शहर बनविणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. महापालिकेच्या भांडेवाडी येथील मलनिस्सारण केंद्रातील क्षमतावाढ प्रकल्पाचे भूमिपूजन, नालंदानगर व ओंकारनगर येथील जलकुंभाचे लोकार्पण तसेच रिंगरोड काँक्रिटीकरणाचा शुभारंभ फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यानिमित्त ओंकारनगर चौक येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके , खासदार कृ पाल तुमाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद कुलकर्णी, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, आमदार सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, अनिल सोले, सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, महापालिकेतील सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, नासुप्रचे सभापती श्याम वर्धने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव पी.जी.गणवीर, समिती सभापती संदीप जोशी, सुनील अग्रवाल आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या आमदारांनी रिंगरोडरील अपघात टाळण्यासाठी आंदोलन केले होेते. परंतु त्यानंतर साधी दुरुस्तीही झाली नव्हती. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्र, विदर्भ व नागपुरात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू झाली. आता हा रिंगरोड सिमेंट कॉक्रिटचा होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या गटाने स्वच्छ भारतासाठी शिफारशी केल्या आहेत. त्यात पिण्याच्या पाण्याचा उद्योगासाठी वापर न करता ५० किलोमीटर परिसरात सांडपाणी उपलब्ध असल्यास ते उद्योगांनी वापरायचे आहे. भांडेवाडी मलनिस्सारण केंद्राची क्षमता १०० दशलक्ष लिटर वरून २०० दशलक्ष लिटर करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुण्यानंतर सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे नागपूर शहर ठरणार आहे. शहरात ३०० कोटीचे सिमेंट रस्ते होत आहे. यामुळे शहरातील अंतर्गत रस्ते चांगले होतील. शहरालगतच्या भागात आरक्षणाचा प्रश्न आहे. या भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी रिझर्व्हेशन मुक्त करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्यात आले आहे. निवासी भागात महापालिका व नासुप्रने सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश फडणवीस यांनी यावेळी दिले. सात हजार कोटीच्या प्रकल्पांना मंजुरीनागपूर शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. मलनिस्सारण केंद्र, शहरातील रिंगरोड सिमेंट क ाँक्रिटचा होत आहे. शहरातील उड्डाण पूल, शहराबाहेरील रिंगरोड अशा विविध सात हजार कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच ८६०० कोटींचा मेट्रो रेल्वे प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करण्याची ग्वाही नितीन गडकरी यांनी दिली. हिंगणा टी- पॉर्इंट -जयताळा-प्रतापनगर-छत्रपती चौक-मानेवाडा चौक- दिघोरी चौक-आॅटोमोटीव्ह चौक-कळमना-मानकापूरपर्यंत २५.२० कि .मी.चे कॉंिक्रटीकरण तसेच मानकापूर ते दाभा दरम्यानच्या ७.१० कि.मी.रस्त्याचे चौपदरीकरण व डांबरीकरण केले जाणार आहे. अंतर्गत रिंगरोडच्या क ाँक्रिटीकरणाच्या कामावर २९२ कोटी ७२ लाखांचा खर्च केला जाणार आहे. हे काम दोन वर्षात पूर्ण केले जाणार आहे. मार्गावरील चौकांची कामे करण्यात येतील. त्यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडण्यासोबतच लोकांची सुविधा होईल. शहराबाहेरील रिंगरोडसाठी १२७२ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रिंगरोडच्या कामासाठी नदीतील गाळ वापरण्याची सूचना त्यांनी केली.मुख्यमंत्र्यांनी नागपूरला स्मार्ट सिटी करण्याची घोषणा केली आहे. ४५०० कोटीचा आराखडा तयार केला आहे. स्मार्ट सिटीसाठी नागरिक ांनी सूचना पाठवाव्या. शहरातील विद्युत वाहिनी भूमिगत करण्यात येणार आहे. शहरात एलईडी पथदिवे लावण्यावर १२० कोटीचा केला जाणार आहे. रिंगरोडला जोडणाऱ्या रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी ३५० कोटीची गरज असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.एलबीटी रद्द झाल्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. गेल्या १५ वर्षात राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने महापालिकेला निधी दिला नाही. राज्य सरकारने महापालिकेला आर्थिक मदत करावी अशी मागणी प्रवीण दटके यांनी केली. आनंद कुलकर्णी यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. सुधाकर कोहळे यांनी सूत्र संचालनासोबतच विकास कामाची माहिती दिली. आभार रमेश सिंगारे यांनी मानले.यावेळी महापालिकेतील नासुप्रचे विश्वस्त भूषण सिंगणे, गटनेते गौतम पाटील, राजू नागुलवार, शिक्षण समितीचे सभापती गोपाल बोहरे, अविनाश ठाकरे,सुधीर राऊ त, झोन सभापती, नगरसेवक व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.(प्रतिनिधी)