शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरला ‘नंबर वन’ बनविणार

By admin | Updated: February 12, 2017 02:35 IST

नागपूर शहरात मेट्रो रेल्वे, एम्स, मिहान, आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिम्बॉयसिस, सीएनजीवर धावणाऱ्या बसेस, सिमेंट रस्ते,

नितीन गडकरी यांची ग्वाही : शुक्रवार तलावात ‘सीप्लेन’ उतरणार नागपूर : नागपूर शहरात मेट्रो रेल्वे, एम्स, मिहान, आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिम्बॉयसिस, सीएनजीवर धावणाऱ्या बसेस, सिमेंट रस्ते, २४ बाय ७ पाणी पुरवठा योजना, कचऱ्यापाासून वीजनिर्मिती, असे विविध विकास प्रकल्प उभे राहत आहेत. यातून पुढील पाच वर्षांत ५० हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार असून, विकासाच्या बाबतीत नागपूर शहर हे देशातील ‘नंबर वन’विकसित शहर होईल. अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी दिली. महापालिका निवडणुकीतील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कापसे व वैष्णवदेवी चौकात गडकरी यांनी जाहीर सभा घेतल्या. शहरातील दूषित पाण्याचा पुनर्वापर करून महापालिकेला वर्षाला १८ कोटींचे उत्पन्न प्राप्त होत आहे. भांडेवाडी येथे वीज प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सिम्बॉयसिसमध्ये स्थानिक विद्यार्थ्यांना २५ टक्के प्रवेश, पारडी भागात ४५० क ोटींची विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. यात उड्डाणपूल, रस्ते, हरिहर मंदिर ते शांतिनगर दरम्यान उड्डाणपूल उभारला जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून २ लाख ५० हजार बेघर लोकांना घरे देण्यात येतील. विविध योजनांतून ६० हजार लोकांवर हृदय शस्त्रक्रिया तर २८ हजार लोकांवर किडनी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच शुक्रवारी तलावात सीप्लेन उतरविण्यात येणार असल्याची घोषणा गडकरी यांनी केली. तिकीट वाटपात काही कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. याची मला जाणीव आहे. परंतु तरीही सर्वजण कामाला लागले असून, सर्वांनी महापालिकेत भाजपची सत्ता आणण्याचा संकल्प केल्याची माहिती गडकरी यांनी दिली. व्यासपीठावर आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे व गिरीश व्यास यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)