शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर ग्रोथ इंजिन ठरेल : नितीन गडकरी यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:14 IST

गेल्या पाच वर्षांत नागपूरचा चेहरामोहरा बदलला आहे. शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा माझा प्रयत्न आहे. हे शहर देशात एक नंबरचे शहर बनवून दाखविण्याचे माझे स्वप्न असून, येणाऱ्या पाच वर्षांत नागपूर देशाच्या विकासात ग्रोथ इंजिन ठरेल, असा दावा केंद्रीय मंत्री व नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांनी केला.

ठळक मुद्देविकासकामांचा वाचला पाढा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या पाच वर्षांत नागपूरचा चेहरामोहरा बदलला आहे. शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा माझा प्रयत्न आहे. हे शहर देशात एक नंबरचे शहर बनवून दाखविण्याचे माझे स्वप्न असून, येणाऱ्या पाच वर्षांत नागपूर देशाच्या विकासात ग्रोथ इंजिन ठरेल, असा दावा केंद्रीय मंत्री व नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांनी केला.मानेवाडा येथे त्यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी खासदार दत्ता मेघे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, आमदार सुधाकर कोहळे, सुलेखा कुंभारे, प्रकाश जाधव, मोहन मते, अशोक मानकर, संजय भेंडे, शेखर सावरबांधे, राजेश तुमसरे, नगरसेवक सतीश होले, छोटू भोयर, किशोर कुमेरिया, मंगला खेकरे, माधुरी ठाकरे, वंदना भगत, विशाखा बांते, भारती बुंदे, स्नेहल बिहारे, नीता मुळे, राजेंद्र सोनकुसरे, अभय गोटेकर, बळवंत जिचकार, रमेश सिंगारे, राजू बहादुरे, भूपेश थूलकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, येणाऱ्या मार्च महिन्यापर्यंत शहरातील सर्व भागात २४ तास पाणी मिळेल. ३५ बस बायोगॅसवर चालेल, २५० इलेक्ट्रिकच्या टॅक्सी धावेल, तेलंखेडी येथे जगातले सर्वात मोठे म्युझिकल फाऊंटेन बनेल, नागपूरची मेट्रो ब्रॉडगेज बनेल, येणाºया वर्षात मिहानमध्ये २५ हजार लोकांना रोजगार, पुढच्या ३ ते ४ वर्षात ५० हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल. मोठमोठ्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून नागपूरच्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाचे दरवाजे खुले झाले आहे. जात, धर्म, भाषा, पार्टीचा विचार न करता नागपूरचा चौफेर विकास करण्यात यश आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.केवळ नागपूरच नाही तर देशभरात विकासकामे केली आहे. गंगेला अविरल निर्मळ बनविण्याचे काम केले आहे. गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्रीला जोडणारा रस्ता १२ हजार कोटी रुपये खर्च करून बांधायला घेतला. बुद्धांच्या १० श्रद्धास्थळाशी संबंधित बौद्ध सर्किटच्या रूपाने १० हजार कोटी रुपयांचे रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. पंढरपूरपासून आळंदी, देहूपासून पंढरपूरपर्यंत पालखी मार्ग मंजूर झाले. शेगावपासून पंढरपूरपर्यंत चार पदरी रस्ता पूर्ण झाला आहे. लंडनमध्ये बाबासाहेबांचे घर घेतले. इंदू मिलची जागा स्मारकाला दिली. महुला बाबासाहेबांचे स्मारक तयार केले आणि आता यशवंत स्टेडियमवर स्मारक बांधतो आहे. कुठल्याही जातीधर्माचा भेदभाव न करता हे काम करीत आलो असल्याचे गडकरी म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019