शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर, वर्धा, बुलडाणा जिल्हा बँका सरकार ताब्यात घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 10:30 IST

पूर्वी आर्थिक डबघाईस आलेल्या महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा आणि बुलडाणा जिल्हा सहकारी बँका शासन ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. शासनाने प्रक्रिया सुरू केली असून, तिन्ही बँका महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विलीन होणार असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांना कर्जवाटप नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पूर्वी आर्थिक डबघाईस आलेल्या महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा आणि बुलडाणा जिल्हा सहकारी बँका शासन ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. शासनाने प्रक्रिया सुरू केली असून, तिन्ही बँका महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विलीन होणार असल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांना कर्ज न दिल्यामुळे सरकार कारवाई करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यासाठी राज्यात जिल्हा बँकांची स्थापना करण्यात आली. पण मूळ उद्देश लयास जाऊन बँकेने सामान्यांना कर्ज न देता आमदार आणि कोट्यधिशांना कर्जवाटप केले. बुलडाणा आणि वर्धा जिल्हा बँकेने राजकारण्यांना कर्जवाटप केले. नागपूर जिल्हा बँकेत आमदार सुनील केदार यांचा १५२ कोटी रुपयांचा घोटाळा उजेडात आला होता.शेतकऱ्यांना कर्जवाटप न झाल्यामुळे बँका ५ ते ७ टक्के कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करू शकल्या नाहीत. या बँका निधीच्या अभावामुळे शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करू शकल्या नाहीत. त्यामुळे तिन्ही बँकांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ताब्यात घेऊन त्याचे पुनरुज्जीवन करण्याची प्रक्रिया आता सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पूर्वी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकसुद्धा डबघाईस आली होती. पण या बँकेवर प्रशासकाची नेमणूक झाल्यानंतर बँकेची आर्थिक स्थिती सुधारली. यावर्षी बँकेने लाभांशचे वाटप केले आहे. तिन्ही बँकांवर प्रशासकाची नेमणूक झाल्यानंतर राष्ट्रीयीकृत बँकांना शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यास सांगितले होते. पण त्यांचीही भूमिका नकारात्मक आहे. त्यामुळे सरकारने सकारात्मक पाऊल उचलत विलीनीकरणाचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

नागपूर, वर्धा आणि बुलडाणा बँकेला महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विलीन करण्याचा शासनाचा विचार आहे. सहकार विभागाची प्रक्रिया सुरू आहे.-प्रवीण वानखेडे,सहनिबंधक, सहकार विभाग.

टॅग्स :bankबँक