शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर ‘सायबर क्राईम’च्या आकडेवारीत ‘व्हायरस’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 10:03 IST

साधारणत: माहिती अधिकारांतर्गत नेमकी, ठोस व मुद्देसूद आकडेवारी मिळणे अपेक्षित आहे. मात्र नागपूर पोलिसांनी ‘सायबर क्राईम’अंतर्गत एकाच वर्षात दाखल गुन्ह्यांची दोन माहिती अधिकारात वेगवेगळी माहिती देण्याचा प्रताप केला आहे.

ठळक मुद्देएकाच वर्षात दाखल गुन्ह्यांची वेगवेगळी माहिती नेमका आकडा तरी किती ?

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साधारणत: माहिती अधिकारांतर्गत नेमकी, ठोस व मुद्देसूद आकडेवारी मिळणे अपेक्षित आहे. मात्र नागपूर पोलिसांनी ‘सायबर क्राईम’अंतर्गत एकाच वर्षात दाखल गुन्ह्यांची दोन माहिती अधिकारात वेगवेगळी माहिती देण्याचा प्रताप केला आहे. २०१५ सालाच्या आकडेवारीत हा घोळ झाला असून या वर्षात ‘सायबर क्राईम’ व ‘आयटी अ‍ॅक्ट’ अंतर्गत नेमके किती गुन्हे दाखल झाले याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. २०१७ मधील माहितीच्या तुलनेत २०१९ मध्ये मिळालेल्या आकडेवारीत गुन्ह्यांची संख्या घटली असल्याने ‘सायबर क्राईम’च्या आकडेवारीत ‘व्हायरस’ तर शिरला नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी २०१७ व २०१९ साली माहिती अधिकारांतर्गत नागपूर पोलिसांकडे माहिती मागविली होती. यात नागपुरात ‘सायबर क्राईम’ व ‘आयटी अ‍ॅक्ट’अंतर्गत किती गुन्हे दाखल झाले, तसेच किती आरोपींना अटक झाली, किती आर्थिक नुकसान झाले इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. पोलीस विभागाकडून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी २०१५ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत नागपूर शहरात ‘सायबर क्राईम’ व ‘आयटी अ‍ॅक्ट’नुसार ३७८ गुन्हे दाखल झाले. यातील १०७ गुन्हे उघडकीस आले व १२३ आरोपींना अटक झाली. मात्र या आकडेवारीवर बारीक नजर टाकली असता २०१५ साली ७१ गुन्हे दाखल झाले होते व ३५ आरोपींना अटक झाली होती. मात्र २०१७ मधील माहिती अधिकारातून प्राप्त माहितीसमवेत चाचपणी केली असता आकडेवारीतील घोळ समोर आला. त्या आकडेवारीनुसार २०१५ साली ‘सायबर क्राईम’ व ‘आयटी अ‍ॅक्ट’नुसार ९८ गुन्हे दाखल झाले होते व २८ आरोपींना अटक झाली होती. या दोन्ही आकड्यांमध्ये तफावत आहे. २०१७ मधील माहितीनुसार २०१५ सालामध्ये ९८ गुन्हे दाखल झाले होते तर २०१९ मधील माहितीत ही संख्या ७१ वर कशी आली. तसेच जर जुन्या माहितीनुसार २०१५ मध्ये २८ आरोपींना अटक झाली होती, तर नव्या माहितीत आरोपींची संख्या अचानक कशी काय वाढली, हे प्रश्न उपस्थित होत आहेत.वर्षभरात दाखल गुन्ह्यांत ३३ टक्क्यांची वाढदरम्यान, गेल्या ५ वर्षांमध्ये उपराजधानीत इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ‘कॅशलेस’च्या युगात आता ‘ई-सेवा’ थेट मोबाईलपर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. युवापिढीसाठी तर इंटरनेट दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक आहे. परंतु ‘ई-क्रांती’सोबतच ‘सायबर क्राईम’च्या प्रकरणांमध्येदेखील वाढ होत आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये नागपुरात ‘सायबर क्राईम’ किंवा ‘आयटी अ‍ॅक्ट’अंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये वाढ दिसून येत आहे. २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये ३३ टक्क्यांची वाढ दिसून आली. या कालावधीत ‘सायबर’ गुन्ह्यांमुळे ९ कोटी ६९ लाख ३३ हजार ७०२ रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम