शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठाचा शैक्षणिक ‘कॅलेंडर’चा मुहूर्त चुकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 11:24 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाकरिता जाहीर केलेल्या शैक्षणिक कॅलेंडरनुसार १५ जूनपासून विद्यापीठाचे नवीन सत्र सुरू होणे अपेक्षित होते. परंतु बहुतांश महाविद्यालये सुनसान असल्याचे चित्र दिसून आले.

ठळक मुद्देसत्र सुरू होऊनदेखील अनेक महाविद्यालये सुनसान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाकरिता जाहीर केलेल्या शैक्षणिक कॅलेंडरनुसार १५ जूनपासून विद्यापीठाचे नवीन सत्र सुरू होणे अपेक्षित होते. परंतु अनेक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले असून सत्र सुरू झाल्यावरदेखील बहुतांश महाविद्यालये सुनसान असल्याचे चित्र दिसून आले. अशा स्थितीत ९० दिवसांच्या नियमाचे पालन नेमके कसे होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.गेल्या दोन वर्षांपासून विद्यापीठाच्या निकालांनी वेग पकडला आहे. यंदादेखील दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील अनेक परीक्षांचे निकाल लागले आहेत. विद्यापीठाने जारी केलेल्या शैक्षणिक कॅलेंडरनुसार वार्षिक प्रणालीच्या अभ्यासक्रमांचे पहिले सत्र १५ जून ते १५ आॅक्टोबर तर दुसरे सत्र १५ नोव्हेंबर ते ३० एप्रिल या कालावधीत होणार आहे. मात्र निकाल लागले असूनदेखील अनेक वर्ग अद्याप सुरू झालेले नाहीत. ‘लोकमत’ने शहरांतील निरनिराळ्या महाविद्यालयांत जाऊन बघितले असता बऱ्याच ठिकाणी शांतता दिसून आली. ‘कॅम्पस’मधील काही विभागांत मात्र वर्ग सुरू झालेले दिसून आले.

सत्र पूर्ण होणार कसे?सेमिस्टर पॅटर्ननुसार महाविद्यालयांना आॅक्टोबर महिन्यापर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. यूजीसीच्या नियमांनुसार सेमिस्टर सत्रात किमान ९० दिवसांचे शैक्षणिक सत्र व्हायला हवे. मात्र निकाल लागूनदेखील वर्ग सुरू झालेले नाहीत. अशा स्थितीत सत्र कसे पूर्ण होणार हादेखील एक प्रश्नच आहे. कागदावर जरी १५ जून रोजी शैक्षणिक सत्र सुरू होणार असले, तरी प्रत्यक्ष वर्गखोल्यांत विद्यार्थी येण्यास विलंब होणार हे निश्चित असल्याचे महाविद्यालयांकडूनच सांगण्यात येत आहे.

६९ टक्के निकाल जाहीरतारखेत विद्यापीठातील १ हजार २७८ पैकी ८७७ परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. जाहीर झालेल्या निकालांची टक्केवारी ही सुमारे ६९ टक्के इतकी आहे. पुढील २ ते ३ दिवसांत हा आकडा साडेनऊशेपर्यंत जाण्याची शक्यता आहे. अनेक विषयांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन झाले असून लवकरात लवकर निकाल लावण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.नीरज खटी यांनी दिली.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ