शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठात होणार चक्रधरस्वामी अध्यासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:53 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यासनानंतर आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात श्रीचक्रधरस्वामी यांच्या नावाने अध्यासन सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात दोन वर्षांअगोदर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी दिले होते आश्वासन : व्यवस्थापन परिषदेत मंजुरीसाठी येणार प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यासनानंतर आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात श्रीचक्रधरस्वामी यांच्या नावाने अध्यासन सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात दोन वर्षांअगोदर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते.नागपूर विद्यापीठात महानुभाव साहित्याचे वाचन, संशोधन व्हावे, वेगवेगळ्या दिशांनी या साहित्यांचा अभ्यास व्हावा, यादृष्टीने महानुभाव पंथाचे जनक श्रीचक्रधरस्वामी यांच्या नावे अध्यासन सुरू करण्यात यावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. शासनदरबारीदेखील यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले. २०१६ साली मुख्यमंत्र्यांनीदेखील नागपूर विद्यापीठात हे अध्यासन सुरू करण्यात येईल व त्याला आर्थिक पाठबळही दिले जाईल, असे आश्वासन दिले होते.यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे २३ जानेवारी २०१८ रोजी शासननिर्णय निर्गमित करण्यात आला होता व दोन कोटी रुपयांचा निधीदेखील मंजूर करण्यात आला होता. याबाबतीत विद्यापीठाने प्रस्ताव तयार केला. १४ फेब्रुवारी २०१८ रोजी झालेल्या अधिष्ठाता मंडळाच्या सभेत हा प्रस्ताव सर्वात अगोदर सादर करण्यात आला. मंडळाने हा प्रस्ताव विद्यापरिषदेकडे पाठविला होता. १३ जून २०१८ रोजी झालेल्या विद्यापरिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. आता मंगळवारी हा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेच्या मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.साहित्य कृतींवर संशोधन अपेक्षितया अध्यासनाअंतर्गत श्रीचक्रधरस्वामी यांचे व त्यांच्या शिष्यगणांनी निर्मित केलेल्या साहित्य कृतीचे अध्ययन, अध्यापन व संशोधन होणे अपेक्षित आहे. या अध्यासनाच्या माध्यमातून त्यांचे विचार व साहित्य जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट राहणार आहे. या अध्यासनाअंतर्गत एक प्राध्यापक कार्यरत असेल. शिवाय संशोधन सहायक असतील व ही पदे विद्यापीठात कार्यरत कर्मचारी-अधिकाऱ्यांमधून भरण्यात यावीत, असे प्रस्तावात नमूद आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठliteratureसाहित्य