शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : ‘व्यवस्थापन’वर कोण, शिक्षण मंच की महाआघाडी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 00:00 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रलंबित व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुका अखेर मंगळवारी होणार आहेत. शिक्षण मंच आणि ‘यंग टीचर्स असोसिएशन’, ‘सेक्युलर पॅनल’ व विद्यापीठ विद्यार्थी संग्राम परिषद या तीन संघटनांच्या महाआघाडीमध्ये लढत होणार आहे. निवडणूक आठ जागांसाठी होणार असून चार जागांवरील उमेदवार थेट व्यवस्थापन परिषदेत गेले असल्याने उर्वरित जागांसाठीच जोरदार संग्राम पहायला मिळणार आहे हे विशेष.

ठळक मुद्देविधिसभेच्या बैठकीत मंगळवारी होणार निवडणुका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रलंबित व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुका अखेर मंगळवारी होणार आहेत. शिक्षण मंच आणि ‘यंग टीचर्स असोसिएशन’, ‘सेक्युलर पॅनल’ व विद्यापीठ विद्यार्थी संग्राम परिषद या तीन संघटनांच्या महाआघाडीमध्ये लढत होणार आहे. निवडणूक आठ जागांसाठी होणार असून चार जागांवरील उमेदवार थेट व्यवस्थापन परिषदेत गेले असल्याने उर्वरित जागांसाठीच जोरदार संग्राम पहायला मिळणार आहे हे विशेष. आपल्या उमेदवारांच्या निवडीसाठी सर्वच संघटनांनी कंबर कसली असून अखेरच्या क्षणापर्यंत ‘संपर्क’ मोहीम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.नियोजित वेळापत्रकानुसार २८ फेब्रुवारी रोजी व्यवस्थापन परिषदेची निवडणूक होणार होती. मात्र निवडणुकींचा वाद न्यायालयात गेला व त्यानंतर प्रक्रिया थंडबस्त्यात पडली. न्यायालयाच्या निर्देशानंतर आता मंगळवार २४ जुलै रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे.विधिसभेच्या निवडणुकांमधील निकालांच्या आधारावर एकूण आठ सदस्य तेथून निवडून जाणार आहेत. अध्यापक गटातून ओबीसी प्रवर्गातून विजयी झालेले डॉ.नितीन कोंगरे, प्राचार्य गटातून ‘व्हीजेएनटी’ प्रवर्गातून विजयी झालेले डॉ.चंदनसिंग रोटेले, व्यवस्थापन प्रतिनिधी गटातील अनुसूचित जाती प्रवर्गातून विजयी झालेले डॉ.सुधीर फुलझेले व पदवीधर गटातून ‘एससी’ प्रवर्गातील विजयी उमेदवार दिनेश शेराम हे व्यवस्थापन परिषदेवर थेट जाणार आहेत. विधिसभेतून उर्वरित चार जागांसाठी जोरदार चुरस राहणार आहे.महाआघाडीतर्फे शिक्षक गटात डॉ. प्रदीप बुटे, प्राचार्य गटात डॉ. मृत्यूंजयसिंग ठाकूर, व्यवस्थापन गटात किशोर उमाठे तर पदवीधर गटात अ‍ॅड. मनमोहन बाजपेयी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर विद्यापीठ शिक्षण मंचाकडून प्राचार्य गटात डॉ. ऊर्मिला डबीर, शिक्षक गटात डॉ. निरंजन देशकर, व्यवस्थापन गटात डॉ.आर.जी. भोयर तर पदवीधर गटात विष्णू चांगदे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. दोन्ही संघटनांकडून जोरदार तयारी असून मतदारांशी संपर्क साधण्याचे अखेरपर्यंत प्रयत्न सुरू होते.पदवीधर निवडणुकीतील चुकांपासून शिकवण ?विधिसभेच्या पदवीधर गटाच्या निवडणुकीत महाआघाडीतील तिन्ही संघटना ‘विद्यापीठ विद्यार्थी संग्राम परिषद’ या ‘बॅनर’खाली लढतील, असे ठरले होते. मात्र ‘सेक्युलर’ने अगोदरपासूनच प्रचाराची वेगळी तºहा ठेवली. त्यांच्या दोन उमेदवारांचा प्रचार ‘सेक्युलर पॅनल’च्या नावाखाली सुरू केला. त्यामुळे महाआघाडीत ‘आॅल इज वेल’ नसल्याचे मतदारांच्या लक्षात आले आणि मतपत्रिकेत याचे प्रतिबिंब उमटले होते. यंदा आता हेच चित्र कायम राहते की मागील चुकांपासून शिकवण घेत तिन्ही संघटना शिक्षण मंचविरोधात एकत्र राहतात हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठElectionनिवडणूक