शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : चहा-कॉफी घोटाळेबाजांवर कारवाई कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 20:34 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील चहा-कॉफी घोटाळ्याच्या प्रकरणात चौकशी समितीने अखेर अहवाल प्रशासनाकडे सादर केला आहे.

ठळक मुद्देचौकशी समितीचा अहवाल प्रशासनाकडे सादर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील चहा-कॉफी घोटाळ्याच्या प्रकरणात चौकशी समितीने अखेर अहवाल प्रशासनाकडे सादर केला आहे. या अहवालातून विद्यापीठात देयकांच्या नावाने कसा गैरप्रकार सुरू होता यावर प्रकाश टाकण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणातील घोटाळेबाजांवर कारवाई कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.नागपूर विद्यापीठाच्या विद्याशाखा विभागात मे महिन्यात अभ्यास मंडळाच्या बैठका घेण्यात आल्या होत्या. त्या बैठकीला उपस्थित राहणाऱ्या तीन सदस्यांना विद्याशाखेकडून चहा देण्यात आला. चहा, कॉफी, नाश्त्याचा एकूण खर्चच दीड लाख रुपयांच्या घरात दाखविण्यात आला. याशिवाय या कालावधीत झालेल्या सहा ते सात बैठकांमध्ये सदस्यांनी पिलेल्या ‘पॅकबंद’ पाणी बॉटल्सचे देयक २४ हजार इतके सादर करण्यात आले आहे. ही बाब वित्त विभागाच्या समोर आल्यानंतर कुलगुरूंना याची माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ ही देयके थांबविली. त्यानंतर एलआयटीचे संचालक डॉ.राजू मानकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीत एकूण सहा सदस्य होते. या समितीला चौकशीची कालमर्यादा ठेवण्यात आलेली नाही, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले होते.चौकशी समितीने प्रशासनाकडे अहवाल सादर केला आहे. या अहवालातून अनेक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात एका लिपीकाची चौकशी व्हायची बाकी होती. परंतु तो दीर्घकालीन रजेवर गेला असल्याने चौकशी समितीचे काम खोळंबले. मात्र त्याने दिलेली माहिती ही चौकशी समितीच्या सदस्यांनादेखील हादरविणारी ठरली. चहा-कॉफीची पक्की देयके नव्हतीच व विद्यापीठात हीच परंपरा असल्याचे त्याने सांगितले. याशिवाय कच्चे देयकदेखील नसल्याचे त्याने सांगितले. जर लाखो रुपयांची देयकांचा कारभार अशा पद्धतीने चालत असेल तर विद्यापीठात असे किती घोटाळे झाले असतील असा प्रश्न समोर येत आहे.नेमके दोषी कोण ?संबंधित लिपीकाने दिलेल्या माहितीवरुन प्रकरणात नेमके दोषी कोण आहे असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. जर पक्की देयके नसतील तर अशी परंपरा कधीपासून विद्यापीठात सुरू आहे, कुणीच यावर आक्षेप का घेतला नाही या मुद्यांवरदेखील नवीन चौकशी लागू शकते. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी कुलगुरूंशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठCorruptionभ्रष्टाचार