शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ; ‘लॉकडाऊन’ उठल्यावरदेखील लगेच परीक्षा नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 11:04 IST

सर्व कुलगुरूंची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासमवेत ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे बैठक झाली. ‘लॉकडाऊन’ उठल्यावरदेखील लगेच परीक्षा घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतरच परीक्षा घेणे योग्य ठरेल, अशी भूमिका अनेक कुलगुरूंनी मांडली.

ठळक मुद्देकुलगुरूंची राज्यपालांसमवेत ‘ऑनलाईन’ बैठक विद्यापीठाकडून विविध पर्यायांचा अभ्यास सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’मुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासह राज्यभरातील सर्वच विद्यापीठांच्या उन्हाळी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सध्याची परिस्थिती लक्षात घेता यासंदर्भात काय करावे याबाबत सर्व कुलगुरूंची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासमवेत ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे बैठक झाली. ‘लॉकडाऊन’ उठल्यावरदेखील लगेच परीक्षा घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतरच परीक्षा घेणे योग्य ठरेल, अशी भूमिका अनेक कुलगुरूंनी मांडली. यासंदर्भात चार कुलगुरूंची समिती तयार केली असून परीक्षांचे नियोजन कसे करावे याबाबत ही समिती अहवाल देणार आहे.नागपूर विद्यापीठसह सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. १४ एप्रिल रोजी ‘लॉकडाऊन’ उठल्यावर तातडीने परीक्षा घेणे शक्य होणार नाही. परीक्षेची तयारी, नवीन वेळापत्रक, अगोदरच्या परीक्षांचे वेळापत्रक, मूल्यांकन यासह विविध गोष्टींचे नियोजन करावे लागणार आहे. जर १४ एप्रिलनंतर आठवड्याभरात किंवा दोन आठवड्यात हे सर्व करण्याचा प्रयत्न केला तर प्रचंड गोंधळ होऊ शकतो. शिवाय बहुतांश विद्यापीठांत कर्मचारी व अधिकाऱ्यांची कमतरता आहे. अशा स्थितीत हे करणे जिकीराचे काम होईल. त्यामुळे जर १४ एप्रिल रोजी ‘लॉकडाऊन’ उठला तर १५ मेच्या आसपास परीक्षा घेता येतील, अशी भूमिका नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी मांडली. नागपूर विद्यापीठाकडून परीक्षा कशा घ्यावा यासंदर्भात तीन वेगवेगळ््या पर्यायांवर विचार सुरू आहे. या पर्यायांची योजना सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.राज्यपालांनी सर्व कुलगुरूंची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर ‘लॉकडाऊन’चा कालावधी कधी संपेल व त्यानंतर संबंधित समितीच्या अहवाल यांच्यावर बरेच काही विसंबून असेल असे स्पष्ट केले. या समितीत ‘एसएनडीटी’, मुंबई, पुणे व कोल्हापूर विद्यापीठांच्या कुलगुरूंचा समावेश आहे.हिवाळी-उन्हाळी परीक्षा एकत्र ?जर ‘लॉकडाऊन’चा कालावधी वाढला तर उन्हाळी परीक्षा उशीरा होतील. त्यामुळे पुढील शैक्षणिक सत्राला फटका बसेल. त्यामुळे उन्हाळी व हिवाळी परीक्षा एकत्र घेण्यावर विचार होईल का यावरदेखील चर्चा झाली. काही कुलगुरूंनी ही संकल्पना उचलून धरली.

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ