शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ :  दीक्षांत समारंभात राहणार सुरक्षेचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 00:19 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०७ व्या दीक्षांत समारंभाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पोलिसांसमवेत विद्यापीठाचीदेखील कार्यक्रमस्थळी कडेकोट सुरक्षाव्यवस्था राहणार आहे. शिवाय अभ्यागतांना प्रवेश न देण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठळक मुद्देअभ्यागतांना ‘नो एन्ट्री’, कालावधीदेखील घटविला

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०७ व्या दीक्षांत समारंभाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे हे या दीक्षांत समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. याशिवाय या समारंभाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायाधीश व नामांकित वकीलदेखील उपस्थित राहतील. त्यामुळे यंदा विद्यापीठाने सुरक्षेवर जास्त भर दिला आहे. पोलिसांसमवेत विद्यापीठाचीदेखील कार्यक्रमस्थळी कडेकोट सुरक्षाव्यवस्था राहणार आहे. शिवाय अभ्यागतांना प्रवेश न देण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.नागपूर विद्यापीठाच्या १०७ व्या दीक्षांत समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून येण्याचे सरन्यायाधीशांनी मान्य केल्यानंतर विद्यापीठाने तयारीला सुरुवात केली होती. सरन्यायाधीश हे स्वत: नागपूर विद्यापीठाचे विद्यार्थी होते. त्यामुळे या दीक्षांत समारंभाचे ‘याची देही, याची डोळा’ साक्षीदार होता व्हावे असा अनेकांचा मानस आहे. मात्र कविवर्य सुरेश भट सभागृहात १८ जानेवारी रोजी होणाऱ्या दीक्षांत समारंभाला अभ्यागतांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. केवळ प्रवेशपत्रिका असलेल्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. अगोदर विद्यापीठाने ‘पासेस’ जारी करण्याचा विचार केला होता. मात्र शैक्षणिक व विधी क्षेत्रातील मान्यवर या समारंभाला उपस्थित राहणार असल्याने प्रवेशपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. या पत्रिका समारंभस्थळी आणणे अनिवार्य राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. व्यस्त वेळापत्रक असतानादेखील सरन्यायाधीशांनी वेळ दिली असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे दीक्षांत समारंभ लांबलचक चालणार नाही. यंदा कालावधीदेखील कमी करण्यात आला आहे. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.विद्यापीठाचीदेखील राहणार सुरक्षासरन्यायाधीश असल्यामुळे कार्यक्रमस्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. सोबतच विद्यापीठातर्फेदेखील महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सची सुरक्षाव्यवस्था तैनात करण्याची तयारी आहे. यासंदर्भात सुरक्षा यंत्रणेशी अधिकाऱ्यांच्या बैठकादेखील सुरू आहेत.गुणवंतांच्या केवळ दोन नातेवाईकांनाच प्रवेशपदकप्राप्त विद्यार्थी तसेच ‘पीएचडी’ मिळणाऱ्या उमेदवारांसमवेत दोनहून जास्त नातेवाईक येत असतात. त्यामुळे दीक्षांत समारंभाच्या ठिकाणी गर्दी होते. परंतु यावेळी यामुळे होणारा गोंधळ टाळण्यासाठी व सुरक्षेच्या दृष्टीने विद्यापीठातर्फे केवळ ‘पीएचडी’ मिळविणाऱ्या व पदकप्राप्त विद्यार्थ्यांच्या आईवडिलांनाच किंवा दोन नातेवाईकांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यांची व्यवस्था भट सभागृहातील ‘बाल्कनी’मध्ये करण्यात येईल. इतर नातेवाईकांना प्रवेश देण्यात येणार नाही.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ