लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभेची बैठक ऐन विधानसभा निवडणुकांच्या निकालांच्या दिवशी आयोजित करण्यात आली आहे. बहुतांश सदस्य हे निवडणुकीच्या मतमोजणीत व्यस्त राहतील. त्यामुळे ही बैठक लवकरच आटोपण्याची चिन्हे आहेत. जर बैठकीसाठी आवश्यक सदस्य नसतील तर सभा १० मिनिटांसाठी स्थगित करण्यात येईल व त्यानंतर परत बैठकीला सुरुवात होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.जर एखादा सदस्य बैठकीत उपस्थित नसेल तर त्याने उपस्थित केलेले प्रश्न इतर सदस्य विचारू शकणार नाही. बैठकीत उपस्थित सदस्यांच्या प्रश्नांनाच विचारण्याची परवानगी देण्यात येईल. विधिसभेच्या कार्यक्रमपत्रिकेनुसार जे सदस्य मतमोजणीमध्ये व्यस्त राहणार आहेत, त्यांचे प्रश्न जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे ११ वाजता सुरू होणारी बैठक दुपारीच संपण्याची शक्यता आहे. नियमांनुसारच विधिसभेची कार्यवाही होईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जर आम्हाला प्रश्न विचारू दिले नाही तर बैठकीचा बहिष्कार करु, अशी भावना काही सदस्यांनी बोलून दाखविली. विधिसभेच्या बैठकीच्या तारखेवरून मागील २० दिवसांपासून प्रशासन व सदस्यांमध्ये वाद सुरू आहे. निकालांमुळे विधिसभेची तारीख बदलण्यात यावी, अशी मागणी काही सदस्यांनी केली होती. शिवाय अनेकांचे प्रश्नदेखील रद्द करण्यात आले.
नागपूर विद्यापीठ : विधिसभेची बैठक लवकर आटोपणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 23:00 IST
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभेची बैठक ऐन विधानसभा निवडणुकांच्या निकालांच्या दिवशी आयोजित करण्यात आली आहे. बहुतांश सदस्य हे निवडणुकीच्या मतमोजणीत व्यस्त राहतील. त्यामुळे ही बैठक लवकरच आटोपण्याची चिन्हे आहेत.
नागपूर विद्यापीठ : विधिसभेची बैठक लवकर आटोपणार
ठळक मुद्देबहुतांश सदस्य निवडणुकीच्या मतमोजणीत व्यस्त