शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

नागपूर विद्यापीठ : पहिल्या व तिसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 21:35 IST

प्रवेशाच्या नावावर विद्यार्थ्यांना बसणारा आर्थिक भुर्दंड थांबविण्यासाठी राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज नागपुर विद्यापीठाने यंदादेखील पदव्युत्तर प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन केंद्रीभूत प्रणालीद्वारे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवेशाच्या तीन टप्प्यांची प्रक्रिया सुरू आहे. परंतु विद्यापीठाने पहिल्या व तिसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक बदलले आहे. सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसंकेतस्थळावर पदव्युत्तर प्रवेशप्रक्रियेच्या नवीन तारखा जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रवेशाच्या नावावर विद्यार्थ्यांना बसणारा आर्थिक भुर्दंड थांबविण्यासाठी राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज नागपुर विद्यापीठाने यंदादेखील पदव्युत्तर प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन केंद्रीभूत प्रणालीद्वारे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवेशाच्या तीन टप्प्यांची प्रक्रिया सुरू आहे. परंतु विद्यापीठाने पहिल्या व तिसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक बदलले आहे. सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.पहिल्या टप्प्यातील अभ्यासक्रमांमध्ये एलएलएम (मास्टर ऑफ लॉ), एमकॉम (प्रोफेशनल), एमएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), एमसीटी (मास्टर ऑफ कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी), एमएफए (मास्टर ऑफ फाईन आर्टस्), मास्टर ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट यांचा समावेश आहे. वेळापत्रकानुसार १६ ते १८ जुलै या कालावधीत दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम सादर करायचे होते व १९ ते २३ जुलैदरम्यान महाविद्यालयांत ‘रिपोर्टिंग’ करायचे होते. मात्र नवीन वेळापत्रकानुसार हे ‘रिपोर्टिंग’ गुरुवारपर्यंत करण्यात आले व तिसऱ्या फेरीसाठीच्या रिक्त जागा २६ जुलै रोजी जाहीर होतील. अखेरची फेरी २६ जुलैऐवजी ३० जुलै रोजी रोजी गुरू नानक भवन येथे पार पडेल.दुसरीकडे तिसऱ्या टप्प्यातील वेळापत्रकातदेखील बदल करण्यात आला आहे. या टप्प्यात ‘एमए’, ‘एमए’ (मास कम्युनिकेशन), ‘एमएसडब्ल्यू’(मास्टर्स ऑफ सोशल वर्क), ‘एमलिब’(मास्टर्स ऑफ लायब्ररी अ‍ॅन्ड इन्फॉर्मेशन सायन्स व ‘मास्टर्स ऑफ इंटस्ट्रीयल रिलेशनन्स अ‍ॅन्ड पर्सनल मॅनेजमेंट’ या अभ्यासक्रमांचा प्रामुख्याने समावेश आहे. जुन्या वेळापत्रकानुसार २७ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार होती. ती आता २९ जुलै रोजी जाहीर होणार आहे. पहिल्या फेरीतील पसंतीक्रम २७ ते २९ जुलैऐवजी २९ ते ३१ जुलै या कालावधीत सादर करता येतील. दुसऱ्या फेरीतील पसंतीक्रम ४ ऑगस्ट ते ६ ऑगस्टऐवजी ६ ते ८ ऑगस्ट या कालावधीत भरता येतील. तर तिसरी व अखेरची असलेली समुपदेशन फेरी १३ ऑगस्टऐवजी १४ ऑगस्ट रोजी गुरू नानक भवन येथे पार पडेल.पहिल्या टप्प्याचे सुधारित वेळापत्रकदुसऱ्या फेरीतील रिक्त जागा २६ जुलैसमुपदेशन फेरी ३० जुलैशैक्षणिक वर्गांना सुरुवात २५ जुलैमहाविद्यालयांत रिपोर्टिंग ३१ जुलै ते २ ऑगस्टतिसऱ्या टप्प्याचे सुधारित वेळापत्रकआक्षेप २५ ते २७ जुलैअंतिम गुणवत्ता यादी २९ जुलैपहिल्या फेरीसाठी पसंतीक्रम २९ ते ३१ जुलैजागांची वाटपयादी १ ऑगस्टमहाविद्यालयांत रिपोर्टिंंग २ ते ५ ऑगस्टपहिल्या यादीतील रिक्त जागा ६ ऑगस्टदुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम ६ ऑगस्ट ते ८ ऑगस्टजागांची वाटपयादी ८ ऑगस्टमहाविद्यालयांत रिपोर्टिंंग ९ ऑगस्ट ते ११ ऑगस्टदुसऱ्या फेरीतील रिक्त जागा १२ ऑगस्टसमुपदेशन फेरी १४ ऑगस्टशैक्षणिक वर्गांना सुरुवात १४ ऑगस्ट

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ