शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : विधानसभा निवडणुकांसाठी परीक्षा 'पोस्टपोन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 21:29 IST

निवडणुकांच्या दरम्यानच विद्यापीठाच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे नियोजित वेळापत्रकात बदल करण्यात येण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २१ व २२ ऑक्टोबर रोजीचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहे.

ठळक मुद्दे२१ व २२ ऑक्टोबर रोजीचे पेपर पुढे ढकलले

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकांचा मुहूर्त जाहीर झाला असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जागांवर २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकांच्या दरम्यानच विद्यापीठाच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे नियोजित वेळापत्रकात बदल करण्यात येण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २१ व २२ ऑक्टोबर रोजीचे पेपर पुढे ढकलण्यात आले असून नवीन वेळापत्रक लवकर जाहीर करण्यात आले आहे.विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान केंद्र म्हणून साधारणत: निवडणूक आयोगाकडून शाळा, महाविद्यालये अधिग्रहित करण्यात येतात. केवळ मतदानाचा दिवसच नाही तर त्याअगोदरचे २ दिवस व नंतरचा १ दिवसदेखील तेथे निवडणुकांचे काम सुरू असते. यात मतदानाची तयारी, कर्मचाऱ्यांची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्थेची आखणी तसेच मतदानानंतरचे सोपस्कार यांचा समावेश असतो. दरम्यान, नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना ३ आॅक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. १०० हून अधिक विषयांच्या परीक्षा नेमक्या २१ ऑक्टोबर रोजीच रोजीच आल्या आहेत. अद्याप निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्र नेमकी कुठली राहतील याची कुठलीही यादी आलेली नाही. त्यामुळे ऐनवेळी धावपळ होण्यापेक्षा विद्यापीठाने वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार सद्यस्थितीत २१ व २२ आॅक्टोबरचे सुमारे १५० पेपर ‘पोस्टपोन’ करण्यात आले आहेत.नवीन वेळापत्रक लवकरचयासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ.प्रफुल्ल साबळे यांना विचारणा केली असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. निवडणुकांच्या वेळी परीक्षा केंद्रांवरील मतदान लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठाच्या परीक्षा जरी मतदानाच्या कालावधीत येत असल्या तरी निवडणुका होणेदेखील तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे विद्यापीठाकडून प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्यात येईल. २० ऑक्टोबरला रविवारची सुटी आहे. यानंतर २१ ऑक्टोबर रोजी मतदान आहे. २२ तारखेलादेखील मतदान केंद्रांवर प्रशासकीय प्रक्रिया सुरू असते. त्यामुळे दोन्ही दिवशीचे पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षांचे नवे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019