शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : आता फक्त विद्यार्थ्यांनाच देता येणार मॉक टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 21:14 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षेसाठी विशेष मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे. परीक्षेचा अंदाज यावा यासाठी अगोदर कुणीही मॉक टेस्ट देऊ शकत होते. मात्र आता केवळ विद्यार्थ्यांनाच ही मॉक टेस्ट देता येणार आहे.

ठळक मुद्देपरीक्षेसाठी ऑनलाईन ओळखपत्रांचे वाटप सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षेसाठी विशेष मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे. परीक्षेचा अंदाज यावा यासाठी अगोदर कुणीही मॉक टेस्ट देऊ शकत होते. मात्र आता केवळ विद्यार्थ्यांनाच ही मॉक टेस्ट देता येणार आहे. दरम्यान परीक्षेसाठी ऑनलाईन ओळखपत्रांचे वाटप सुरू झाले असून त्यातच युझर आयडी व पासवर्डचा समावेश राहणार आहे.परीक्षांसाठी मोबाईल अ‍ॅप तयार करणारे नागपूर विद्यापीठ हे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले. मात्र मॉक टेस्टवरुन विद्यापीठावर काही लोकांनी टीका करण्यास सुरुवात केली. मात्र ही परीक्षा नेमकी कशी असेल व उत्तरे कशा पद्धतीने द्यावी लागतील याचा अंदाज यावा यासाठीच ही मॉक टेस्ट आहे. वेळेच्या अभावामुळे विषयनिहाय मॉक टेस्ट घेणे शक्य नसल्याचे परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, विद्यापीठातील सुमारे ७० हजार विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देणार आहेत. प्रत्यक्षात तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना अ‍ॅप डाऊनलोड केले होते. त्यातील अनेकांनी मॉक टेस्ट देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विद्यापीठाच्या सर्व्हरवर ताण आला. हीच बाब लक्षात घेत विद्यापीठाने मॉक टेस्ट केवळ विद्यार्थ्यांनाच देता येईल, असे निश्चित केले आहे. विद्यापीठाकडे मोबाईल क्रमांकाची नोंद असलेल्या विद्यार्थ्यांनाच ही सराव परीक्षा देता येणार आहे. सराव परीक्षेच्या पर्यायावर गेल्यास विद्यार्थ्यांच्या नोंदणी क्रमांकावर आधी ‘ओटीपी’ येणार असून त्यानंतरच विद्यार्थी ती परीक्षा देऊ शकणार आहेत.विद्यार्थ्यांपर्यंत ओळखपत्र महाविद्यालयांनी पोहोचवावीनागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षांना १ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. यंदा विद्यापीठाने परीक्षेसाठी ऑनलाईन ओळखपत्र पाठविले आहे. हे सर्व ओळखपत्र महाविद्यालयांना पाठविण्यात आले असून तेथून ते विद्यार्थ्यांना जाणार आहेत. विद्यार्थ्यांपर्यंत ओळखपत्र ई-मेल, व्हॉट्सअप किंवा प्रत्यक्ष पोहोचविण्याची जबाबादारी महाविद्यालयांची राहणार आहे, असे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा