शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ; एकाच महाविद्यालयातील ४२ विद्यार्थ्यांच्या आईचे नाव एकसारखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 10:46 IST

Nagpur University, Nagpur News २८ सप्टेंबर रोजी एका महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र डाऊनलोड केले व ते विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन माध्यमातून पोहोचवले. यातील तब्बल ४२ विद्यार्थ्यांच्या आईचे नाव ज्योती असे नमूद करण्यात आले होते.

ठळक मुद्देप्रवेशपत्रावर आई झाल्या ‘ज्योतीच ज्योती’सर्व्हरवरील ताणामुळे घोळ

योगेश पांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे पहिल्यांदाच ऑनलाईन परीक्षा घेण्यात येत आहेत. यासाठी विशेष मोबाईल अ‍ॅपदेखील विकसित केले आहे. यासाठी आवश्यक असलेल्या परीक्षा प्रवेशपत्राबाबत घडलेली अजबच बाब समोर आली आहे. प्रवेशपत्रावर एकाच महाविद्यालयातील ४२ विद्यार्थ्यांच्या आईचे नाव ज्योती असे आले होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना धक्का बसला होता. सर्व्हरवरील ताणामुळे प्रवेशपत्रातील हा घोळ झाला होता व आता ही त्रुटी दूर करण्यात आली असल्याचा दावा विद्यापीठातर्फे करण्यात आला आहे.

विद्यापीठाने विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले व ते महाविद्यालयांना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचे होते. मात्र कर्मचारी आंदोलनामुळे १ ऑक्टोबरपासून परीक्षा सुरूच झाली नाही. दरम्यान, २८ सप्टेंबर रोजी एका महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र डाऊनलोड केले व ते विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन माध्यमातून पोहोचवले. यातील तब्बल ४२ विद्यार्थ्यांच्या आईचे नाव ज्योती असे नमूद करण्यात आले होते. ही बाब महाविद्यालयाने विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिली. याची चौकशी केली असता सर्व्हरवरील ताणामुळे २८ व २९ सप्टेंबर रोजी काही विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्राचा डाटा मिसमॅच झाल्याची माहिती मिळाली. परीक्षेचे मोबाईल अ‍ॅप हे विद्यार्थ्यांसाठीच होते. मात्र आवश्यकता नसतानादेखील विद्यार्थी सोडून अनेकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यामुळे सर्व्हरवरील ताण वाढला होता. आता ही त्रुटी दूर करण्यात आली असून विद्यार्थ्यांना सुधारित ओळखपत्रे पोहोचली आहेत, असे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना डाऊनलोड करता येणार प्रवेशपत्रअनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालये प्रवेशपत्रे देण्यासंदर्भात सहकार्य करत नसल्याची बाब मांडली होती. विद्यार्थ्याना प्रवेशपत्र मिळण्यास अडचणी येऊ नये यासाठी विद्यापीठाने नवीन लिंक तयार केली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वत:चे प्रवेशपत्र घरबसल्या डाऊनलोड करता येणार आहे, असे डॉ. साबळे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ