शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ :अभ्यास मंडळाच्या बैठका स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 11:25 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना घेण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी विद्यापीठातर्फे अभ्यास मंडळाच्या बैठका स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देपरीक्षा पुढे ढकलण्याबाबत सरकारच्या सूचनांकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना घेण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी विद्यापीठातर्फे अभ्यास मंडळाच्या बैठका स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात पत्रदेखील जारी करण्यात आले आहे. दरम्यान, उन्हाळी परीक्षा स्थगित करण्याचा अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. सरकारकडून काहीही सूचना आली नसल्याने सध्या तरी नियोजित वेळापत्रकानुसारच परीक्षा होतील, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.जगभरात ‘कोरोना’चा ताप वाढत असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानेदेखील यासंदर्भात पाऊल उचलले आहे. ‘यूजीसी’च्या सूचनेनंतर विद्यापीठाने दोन दिवसांअगोदरच सर्व परिसंवाद, कार्यशाळा व व्याख्यान रद्द केले. त्याचप्रमाणे सर्व महाविद्यालयांनादेखील ‘कोरोना’पासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.विद्यापीठात ९ तारखेपासून अभ्यास मंडळांच्या बैठकांना सुरुवात झाली. या बैठका २४ मार्चपर्यंत चालणार होत्या. परंतु १३ मार्चपासूनच्या अभ्यास मंडळाच्या बैठका, निवडणूक, तदर्थ समिती व विशेष कार्य समितीच्या सभा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती विद्या शाखेचे उपकुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी दिली.परीक्षेसंदर्भात ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना सुरुवात झाली आहे. या परीक्षा समोर ढकलण्यात येतील, अशी विद्यापीठ वर्तुळात चर्चा आहे. यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांना विचारणा केली असता, असा कुठलाही निर्णय अद्याप झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्य शासनाकडून आम्हाला कुठल्याही सूचना किंवा निर्देश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे नियोजित वेळापत्रकानुसारच परीक्षा सुरू आहेत. जर वरिष्ठ पातळीहून काही सूचना आल्या तर मग पुढील पावले उचलू, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक परीक्षा केंद्रावर साबण तसेच ‘सॅनिटायझर्स’ उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचा खर्चदेखील विद्यापीठ देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ