शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

नागपूर विद्यापीठ : पेपर सेटर्सच्या गहाळ रेकार्ड्सचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:14 IST

बऱ्याच काळापासून मानधनाच्या प्रतीक्षेत असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पेपर सेटर्स व मॉडरेटर्ससाठी आनंदाची बातमी आहे. परीक्षा विभागाच्या गोपनीय शाखेचे अधिकारी व कर्मचारी त्यांचे रेकार्ड शोधायला लागले असून काही पेपर सेटर्स व मॉडरेटर्सचे मानधनाचे थकीत बिल मंजुरीसाठी वित्त व लेखा अधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे पेपर सेटर्सचे थकीत मानधन मिळणे शक्य होणार आहे.

ठळक मुद्देशिक्षकांना मानधन मिळण्याची चिन्हे : विद्यापीठाच्या वित्त विभागाकडे प्रस्तावलोकमत इम्पॅक्ट

 लोकमत  न्यूज  नेटवर्क  नागपूर : बऱ्याच काळापासून मानधनाच्या प्रतीक्षेत असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पेपर सेटर्स व मॉडरेटर्ससाठी आनंदाची बातमी आहे. परीक्षा विभागाच्या गोपनीय शाखेचे अधिकारी व कर्मचारी त्यांचे रेकार्ड शोधायला लागले असून काही पेपर सेटर्स व मॉडरेटर्सचे मानधनाचे थकीत बिल मंजुरीसाठी वित्त व लेखा अधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे पेपर सेटर्सचे थकीत मानधन मिळणे शक्य होणार आहे. गोपनीय शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार लवकरच बिल मंजूर करून संबंधित शिक्षकांना त्यांचे मानधन दिले जाईल. सध्या किती शिक्षकांचे मानधन शिल्लक आहे, याचीही तपासणी केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्व रेकार्ड शोधून त्यांचे बिल वित्त व लेखा विभागाला पाठविण्यात येईल जेणेकरून मानधनाची रक्कम शिक्षकांच्या खात्यात जमा केली जाईल.विशेष म्हणजे विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका तयार करणाºया शिक्षक व मॉडरेटर्स यांना बºयाच काळापासून त्यांचे मानधन मिळाले नव्हते. लोकमतने विद्यापीठाचा हा गलथानपणा प्रकाशात आणला होता. यासोबत या शिक्षकांचे मानधन इतर शिक्षकांनीच उचलल्याची बाब उजेडात आणली होती. मानधनाबाबत विचारणाºया शिक्षकांना त्यांचे मानधन पाठविल्याचे सांगण्यात येते. २०१६ पासून याप्रकारची प्रकरणे वाढल्याचेही दिसून येत आहे. या बातमीमुळे विद्यापीठ प्रशासनात खळबळ उडाली होती. यावर कुठल्याही प्रकारचा घोटाळा समोर येऊ नये म्हणून गोपनीय शाखेतून अनेक पेपर सेटर्स आणि मॉडरेटर्सचे मानधनासंबंधी रेकार्ड्स गायब करण्यात आले होते.बातमीमुळे पोहचायला लागले शिक्षकसुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार विद्यापीठात शिक्षकांच्या मानधनासंबंधी भ्रष्टाचाराचा संशय व्यक्त करणारी बातमी प्रकाशित होताच प्रश्नपत्रिका तयार करणारे शिक्षक विद्यापीठाच्या परीक्षा विभागात पोहचून चौकशी करायला लागले होते. शिक्षकांचा असा कल पाहता गोपनीय शाखेचे अधिकारी तडकाफडकी मानधनाचे बिल मंजूर करायला लागल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा