शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बीए अ‍ॅडिशनलची परीक्षा घेण्याचा नागपूर विद्यापीठाला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 11:03 IST

Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला बीए अ‍ॅडिशनल अभ्यासक्रमाची परीक्षा घेण्याचाच विसर पडला आहे. मागील दोन वर्षांपासून या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे आयोजनच करण्यात आलेले नाही.

ठळक मुद्देदोन वर्षांपासून विद्यार्थी प्रतीक्षेतपरीक्षा विभागाचे दुर्लक्ष

आशिष दुबे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला बीए अ‍ॅडिशनल अभ्यासक्रमाची परीक्षा घेण्याचाच विसर पडला आहे. मागील दोन वर्षांपासून या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे आयोजनच करण्यात आलेले नाही. अभ्यासक्रमाची परीक्षा होणार की नाही हेदेखील निश्चित झालेले नाही.

मागील वर्षी कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर सर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याच्या उन्हाळी परीक्षा २०२० चे आयोजन सप्टेंबरमध्ये करण्यात आले होते. हिवाळी-२०२० परीक्षांचे आयोजन या वर्षाच्या सुरुवातीला करण्यात आले तर उन्हाळी-२०२१ परीक्षा जूनपासून आयोजित करण्यात आल्या. मात्र या परीक्षांमध्ये एकदाही बीए-अ‍ॅडिशनल अभ्यासक्रमाच्या परीक्षेबाबत विचार करण्यात आला नाही. परीक्षा विभागाच्या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. कोरोना संसर्ग असतानादेखील परीक्षा विभागाने बीएड अभ्यासक्रमाच्या ऑफलाईन परीक्षांचे २०२० मध्ये आयोजन केले होते. परंतु आमची परीक्षाच घेण्यात आलेली नाही. त्यामुळे तणाव वाढतो आहे, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

आता परीक्षा घेऊ शकत नाही

यासंबंधात विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.प्रफुल्ल साबळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनीदेखील याला दुजोरा दिला. कोरोनाची स्थिती पाहता आता या परीक्षा होऊ शकत नाही. त्यांचे आयोजन कधी होईल हेदेखील सांगितल्या जाऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. या अभ्यासक्रमात नेमके किती विद्यार्थी आहेत याचीदेखील नेमकी माहिती उपलब्ध नाही.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ