शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच दिवशी नागपूर विद्यापीठ ‘फेल’; परीक्षा रद्द करण्याची नामुष्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 21:39 IST

Nagpur news राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेच्या पहिल्या दिवशी ढिसाळ नियोजन दिसून आले. सर्व्हरच हँग झाल्याने ऑनलाईन परीक्षाच होऊ शकली नाही. विद्यार्थी सातत्याने प्रयत्न करून अक्षरशः थकून गेले होते. मात्र पेपर सुरू होऊ शकले नाही.

ठळक मुद्देसर्व्हर हँग, नियोजनाचा विद्यार्थ्यांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेच्या पहिल्या दिवशी ढिसाळ नियोजन दिसून आले. सर्व्हरच हँग झाल्याने ऑनलाईन परीक्षाच होऊ शकली नाही. विद्यार्थी सातत्याने प्रयत्न करून अक्षरशः थकून गेले होते. मात्र पेपर सुरू होऊ शकले नाही. अखेर दुपारी विद्यापीठाने तांत्रिक चूक असल्याचे मान्य करत २५ मार्च रोजीचे सर्व पेपर रद्द झाल्याची घोषणा केली. आता हे पेपर कधी होतील याबाबत विद्यापीठाने काहीही स्पष्ट केलेले नाही.

यंदा विद्यापीठाने वेबबेस्ड परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. गुरुवारी परीक्षेचा पहिलाच दिवस होता. पहिल्या टप्प्यात बीकॉम, बीएस्सी, बीई, बीबीए इत्यादी अभ्यासक्रमांचा समावेश होता. विद्यार्थ्यांना एका तासाच्या कालावधीत ४० प्रश्न सोडवायचे होते. ८ ते ११ या कालावधीत पहिल्या सत्रातील विद्यार्थी परीक्षा देऊ शकणार होते. सकाळी ८ वाजता विद्यार्थ्यांनी लॉगिन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पेपर सुरूच होऊ शकला नाही. सर्व्हर एरर इन अप्लिकेशन असे स्क्रीनवर लिहून येत होते. विद्यार्थ्यांनी हेल्पलाईनवर फोन केल्यानंतर थोड्या वेळात परीक्षा सुरू होईल, असे त्यांना सांगण्यात येत होते. मात्र दुपारपर्यंत पेपर सुरू होऊ शकले नाही. दुपारच्या सत्रातदेखील हीच स्थिती होती. अखेर विद्यापीठाने गुरुवारचे सर्व पेपर रद्द करण्याची घोषणा केली. यासंदर्भातील नवीन तारीख लवकरच घोषित करण्यात येईल, असे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले.

हेल्पलाईनवर रिस्पॉन्स नाही

सकाळपासून पेपर उघडत नसल्याने विद्यार्थ्यांनी हेल्पलाईनवर संपर्क साधण्यास सुरुवात केली. मात्र हेल्पलाईन सातत्याने बिझी येत होती. रिस्पॉन्स मिळत नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले होते.

फोटोचे दिले कारण

अनेक विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून संदेश गेले की, फोटो योग्य पद्धतीने कॅप्चर न झाल्यामुळे हा घोळ झाला. मात्र फोटो कॅप्चर न होणे व विद्यापीठाच्या सर्व्हरची काय लिंक आहे, हे कुणीही सांगितले नाही.

‘वेबबेस्ड’चा पहिलाच प्रयोग

उन्हाळी परीक्षा ‘अ‍ॅप’च्या माध्यमातून झाल्या होत्या. सुरुवातीला त्यात काही प्रमाणात गोंधळ झाला होता. मात्र त्यानंतर परीक्षा सुरळीत पार पडल्या होत्या. ‘कोरोना’मुळे ‘ऑनलाईन’ परीक्षा घेण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले होते. त्यानुसार विद्यापीठाने ‘अ‍ॅप’ऐवजी ‘वेबबेस्ड’ परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. विद्यापीठातील हा असा प्रथमच प्रयोग होता. आश्चर्याची बाब म्हणजे यासंदर्भातील कंपनी विद्यापीठाने ऐनवेळी नेमली. कमी कालावधीत नियोजन कसे होणार, हा प्रश्न तेव्हाच उपस्थित करण्यात आला होता.

मॉक टेस्ट का नाही?

‘वेबबेस्ड’ परीक्षेचा प्रयोग असल्याने मॉक टेस्ट होणे आवश्यक होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना सराव करता आला असता. मात्र अनेक विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट देताच आली नाही. तेव्हा तांत्रिक अडचण दाखविण्यात येत होती.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ