शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा जुलैमध्ये?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 11:22 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा जुलैमध्ये घेण्यात येण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विद्यापीठाच्या ८० टक्के परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा जुलैमध्ये घेण्यात येण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विद्यापीठाच्या ८० टक्के परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मंगळवारी विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरातील विद्यापीठांच्या परीक्षा व शैक्षणिक वर्षाच्या वेळापत्रकाचा अहवाल जारी केला. यावर मंथन करण्यासाठी बुधवारी नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची बैठक बोलविण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.परीक्षा आणि शैक्षणिक वर्षासंदर्भात युजीसीच्या अंतर्गत समिती गठित करून देशपातळीवर एकच निर्णय घेण्याची भूमिका घेण्यात आली होती. युजीसीने देशभरातील विद्यापीठांच्या परीक्षा आणि शैक्षणिक वर्षाच्या वेळापत्रकाचा अहवाल जाहीर केला आहे. यानुसार १६ ते ३१ जुलैदरम्यान परीक्षा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.त्यानुसार उर्वरित सत्र १ ते १५ जुलैदरम्यान पूर्ण करत १६ ते ३१ जुलैपर्यंत परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, यासंदर्भातील सर्व निर्णय हा त्या त्या राज्य शासनांवर सोपविण्यात आला आहे. त्यावर विद्यापीठाच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. मात्र, राज्य शासनाकडून यावर स्पष्ट निर्देश आल्यावर नेमक्या परीक्षेच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. युजीसीने नवीन शैक्षणिक सत्र १ आॅगस्टपासून तर नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी १ सप्टेंबरपासून सुरू करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांना विचारणा केली असता त्यांनी बुधवारी परीक्षा मंडळाची बैठक असल्याचे स्पष्ट केले. युजीसीच्या अहवालाबाबत राज्य शासन काय निर्णय घेईल त्यावर पुढील पावले उचलली जातील, असे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ