शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
3
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
4
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
5
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
6
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
7
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
8
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
9
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
10
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
11
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
12
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
13
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
14
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
15
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
16
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
17
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
18
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
19
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
20
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...

नागपूर विद्यापीठाच्या विधिसभेतील पदवीधरमध्ये ‘शिक्षण मंच-अभाविप’चीच बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 12:12 AM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभेतील पदवीधर गटाच्या निवडणुकांमध्ये ‘शिक्षण मंच-अभाविप’ने बाजी मारली आहे. १० पैकी ६ जागांवर ‘शिक्षण मंच-अभाविप’चे उमेदवार विजयी झाले आहेत.

ठळक मुद्दे‘परिवर्तन’ची धडाक्यात ‘एन्ट्री’ : चांगदे, मेश्राम, डेकाटे विजयी : विधिसभेत तुल्यबळ स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभेतील पदवीधर गटाच्या निवडणुकांमध्ये ‘शिक्षण मंच-अभाविप’ने बाजी मारली आहे. १० पैकी ६ जागांवर ‘शिक्षण मंच-अभाविप’चे उमेदवार विजयी झाले आहेत. तीन मोठ्या संघटना मिळून एकत्रितरीत्या उतरलेल्या महाआघाडीला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. तर नव्यानेच मैदानात उतरलेल्या ‘परिवर्तन पॅनल’ने धडाक्यात ‘एन्ट्री’ करत दोन जागांवर विजय मिळविला. तर आरक्षित गटातील चार जागांवर त्यांचे उमेदवार दुसऱ्या स्थानावर राहिले.रविवार ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकांमध्ये केवळ ४१.१६ टक्के मतदान झाले. खुल्या प्रवर्गातील ५ व आरक्षित प्रवर्गांमधील ५ अशा एकूण १० जागांच्या मतमोजणी प्रक्रियेला मंगळवारी सकाळी १० वाजता सुरुवात झाली. मध्यरात्रीनंतरदेखील मतमोजणी सुरू होती व बुधवारी रात्री ३ वाजता मतमोजणी पूर्ण झाली. रात्री १ वाजेनंतर ‘शिक्षण मंच-अभाविप’चे विष्णू चांगदे, ‘परिवर्तन पॅनल’चे शीलवंत मेश्राम व प्रशांत डेकाटे हे विजयी झाले. मतमोजणीनंतर ‘शिक्षण मंच-अभाविप’ व ‘परिवर्तन’च्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.१८ तास चालली मतगणना प्रक्रियामंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासूनच विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी कामावर होते. मंगळवारी सकाळी १० वाजता सुरू झालेली मतगणना प्रक्रिया बुधवारी रात्री ३ वाजेपर्यंत चालली. मतगणना प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एकाचवेळी चेहऱ्यावर  थकवा आणि प्रक्रिया सुरळीतपणे आटोपल्याचे समाधान दिसून येत होते.

टॅग्स :Electionनिवडणूकuniversityविद्यापीठ