शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : परीक्षा रद्द करण्याबाबतचा संभ्रम कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 20:32 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठांमधील अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र अद्यापही शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे यासंदर्भात कुठलेही लेखी निर्देश आलेले नाहीत.

ठळक मुद्देराज्य शासनाकडून अद्यापही लेखी आदेश नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठांमधील अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र अद्यापही शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे यासंदर्भात कुठलेही लेखी निर्देश आलेले नाहीत. शिवाय राज्यपाल कार्यालयाकडूनदेखील काहीही सांगण्यात आलेले नाही. अशा स्थितीत परीक्षा रद्द करायच्या की जुलै महिन्यात परीक्षा घेण्यासाठीची तयारी कायम राखावी हा प्रश्न विद्यापीठ प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात दररोज निर्देशांची प्रतीक्षा करण्यात येत आहे.राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा कशा घ्याव्यात यासंदर्भात राज्य सरकारने कुलगुरूंची समिती स्थापन केली होती. त्या समितीने दिलेल्या शिफारशींनुसार सरकारने ८ मे रोजी परिपत्रक काढले. त्या परिपत्रकात विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्या, असे नमूद केले होते. परिपत्रकाच्या अनुषंगाने नागपूर आणि अमरावती विद्यापीठाने परीक्षा घेण्यासंदर्भात तयारी केली आहे. या परीक्षा कॉलेजस्तरावर असाव्या की विद्यापीठाने घ्याव्या याबाबत जूनच्या अखेरच्या आठवड्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आढावा बैठक घेणार होते. मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. ८ मेच्या निर्देशानंतर विद्यापीठाला परीक्षांबाबत इतर कुठलेही निर्देश राज्य शासनाकडून आलेले नाहीत. केवळ नागपूरच नव्हे तर इतर कुठल्याही विद्यापीठाला असे निर्देश प्राप्त झालेले नाहीत. दरम्यान, सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यावर राज्यपालांनी आक्षेप घेतला आहे. अशा स्थितीत विद्यापीठ प्रशासनासमोर संभ्रम निर्माण झाला आहे.बॅकलॉग विद्यार्थ्यांचे काय होणार ?याशिवाय मागील सत्रांचे विषय बॅक असलेल्या विद्यार्थ्यांचे काय करायचे हादेखील विद्यापीठासमोर मोठा प्रश्न आहे. अशा विद्यार्थ्यांची संख्या हजारोंनी आहे. या विद्यार्थ्यांना अगोदरच्या सत्रांच्या आधारावर श्रेणी देऊन उत्तीर्ण केले तर ते नियमांचे उल्लंघन ठरेल. यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांना विचारणा केली असता राज्य शासनाकडून नागपूर विद्यापीठाला कुठलेही अधिकृत लेखी निर्देश आलेले नाहीत. त्यामुळे तोपर्यंत काहीच बोलणे किंवा अंदाज बांधणे शक्य होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा