शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ ; ‘बीएड’च्या परीक्षा परत पुढे ढकलल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 11:08 IST

Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अखेर ‘बीएड’च्या २०१९-२० वर्षातील प्रथम सत्राच्या ऑफलाईन परीक्षा परत एकदा पुढे ढकलल्याआहेत. ‘

ठळक मुद्दे ‘कोरोना’चे आकडे वाढत असल्याने विद्यापीठाने २४ व २६ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणारे पेपर पुढील निर्देशांपर्यंत पुढे ढकलले आहेत. परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी त्यासंदर्भातील अधिसूचनादेखील जारी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अखेर ‘बीएड’च्या २०१९-२० वर्षातील प्रथम सत्राच्या ऑफलाईन परीक्षा परत एकदा ‘पोस्टपोन’ केल्या आहेत. ‘कोरोना’चे आकडे वाढत असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ‘कोरोना’मुळे दुसऱ्यांदा परीक्षा ‘पोस्टपोन’ करावी लागली आहे. जी परीक्षा २०१९ च्या हिवाळ्यात पूर्ण व्हायला पाहिजे होती, ती आता कधी होणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.

२०१९-२० मध्ये बी.एड.च्या प्रवेशप्रक्रियेला विलंब झाल्यामुळे हिवाळी २०१९ ची प्रथम सत्राची परीक्षा १६ मार्चला सुरू झाली होती. मात्र, पहिला पेपर होताच ‘लॉकडाऊन’ करण्यात आले. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली. ही परीक्षा हिवाळी २०१९ ची असल्याने विद्यापीठाला साथ प्रतिबंधक कायद्यानुसार या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात सरळ प्रवेश देणेही अशक्य आहे. त्यांची प्रथम सत्राच्या परीक्षेचा निकाल जाहीर करून त्या आधारे द्वितीय सत्रातील विद्यार्थ्यांना तिसऱ्या सत्रात प्रमोट करता येणार आहे. त्यामुळे ९ ते ११ नोव्हेंबरदरम्यान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु अनेक विद्यार्थी बाहेरगावचे आहेत. आता नागपुरात येऊन परीक्षा कशी द्यायची व त्या कालावधीत रहायचे कुठे हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न पडला होता. कोरोनामुळे परीस्थिती नियंत्रित झाल्यावरच विद्यापीठाने परीक्षा घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली गेली व विद्यापीठानेदेखील परीक्षा पुढे ढकलली होती.

मनपाकडून विद्यापीठ प्रशासनाला फोन

बुधवारी दुपारी २ वाजता विद्यार्थ्यांचा ‘एज्युकेशनल टेक्नॉलॉजी अ‍ॅन्ड कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन्स’ हा पेपर होता. विद्यार्थी पेपरसाठी परीक्षा केंद्रांवरदेखील पोहोचले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयच ‘कोरोना’मुळे ‘सील’ करण्यात आल्याने तेथील विद्यार्थ्यांना दुसऱ्या परीक्षा केंद्रांवर हलविण्यासाठी विद्यापीठाने वाहनेदेखील पाठविली. मात्र मनपा प्रशासनाकडून विद्यापीठाला फोन गेला व परीक्षा घेतल्यास ‘कोरोना’च्या नियमावलीचा भंग ठरेल असे सांगण्यात आले. त्यामुळे विद्यापीठाने तातडीने परीक्षा पुढे ढकलण्याचे निर्देश जारी केले, अशी माहिती कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांनी दिली.

टॅग्स :examपरीक्षा