शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

नागपूर विद्यापीठ; अखेर १४ एप्रिलपर्यंतच्या सर्व परीक्षा ‘पोस्टपोन्ड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 08:37 IST

अखेर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने १ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान आयोजित सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्दे२८३ परीक्षांचा समावेश,दोन लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची होती परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’मुळे देशभरात ‘लॉकडाऊन’ घोषित झाला असताना राज्य शासनाकडून विद्यापीठांच्या परीक्षा ‘पोस्टपोन’ करण्यासंदर्भात कुठलेही निर्देश न आल्यामुळे अनिश्चितता निर्माण झाली होती; मात्र अखेर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने १ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान आयोजित सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अडीचशेहून अधिक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून दोन लाख दहा हजारांहून अधिक विद्यार्थी यात बसणार होते. विशेष म्हणजे नागपूर विद्यापीठाला यासंदर्भात अद्यापही उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे कुठलेही पत्र आलेले नाही. यासंदर्भात ‘लोकमत’ने प्रश्न उपस्थित केला होता हे विशेष.‘कोरोना’संदर्भात राज्य शासनाच्या निर्देशांनंतर नागपूर विद्यापीठाने ३१ मार्चपर्यंतच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे साधारणत: एक लाख विद्यार्थ्यांच्या १८७ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. १ एप्रिलपासूनचे पेपर नियोजित वेळापत्रकानुसारच होणार होते. ३ एप्रिलपासून तर विद्यापीठाचा परीक्षांचा सर्वात मोठा टप्पा सुरू होणार होता. सुमारे २८३परीक्षांना २ लाख १० हजार विद्यार्थी बसणार होते. त्यात बी.ए., बी.कॉम., बी.एस.सी., बी. ई., एम.टेक. (पुरवणी) व एम.ए. यांसारख्या प्रमुख व नियमित परीक्षांचा समावेश होता. आता विद्यापीठाने या परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन वेळापत्रक तयार करावे लागणार आहे. आतापर्यंत एकूण विद्यापीठाने साधारणत: साडेचारशेहून परीक्षा पुढे ढकलल्या असून यात ३ लाख विद्यार्थी सहभागी होणार होते.

परीक्षा विभागाची कसरतच होणारयासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याचे परिपत्रक जारी केल्याचे स्पष्ट केले. आता पुढील परीक्षांचे नियोजन करण्यासंदर्भात परीक्षा विभागाची कसरतच होणार आहे. पुरवणी परीक्षा, नियमित परीक्षा यांच्यासह ‘पोस्टपोन’ केलेल्या परीक्षांचे नियोजन करण्याचे आव्हान अधिकाऱ्यांसमोर निश्चितच राहणार आहे.उच्च व तंत्रशिक्षण विभाग झोपेतचपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात ‘लॉकडाऊन’ची घोषणा केल्यामुळे साधारणत: १५ एप्रिलपर्यंतच्या सर्वच परीक्षा पुढे ढकलण्यात येतील, असा अंदाज विद्यापीठ वर्तुळात वर्तविण्यात येत होताच. मात्र विद्यापीठाला परीक्षा पुढे ढकलण्यासाठी शासनाच्या अधिकृत निर्देश अथवा पत्राची आवश्यकता होती; मात्र उच्च व तंत्रशिक्षण विभागानेदेखील कुठलेही अधिकृत निर्देश दिलेले नाहीत. विद्यापीठाने अखेर केंद्र शासनाचा गृह विभाग व राज्य शासनाच्या महसूल, वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या २५ मार्च रोजीच्या पत्राचा आधार घेत विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलण्याचे निर्देश जारी केले. संकटाच्या स्थितीत उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून याबाबतीत पुढाकार का घेण्यात आला नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ